नगरपंचायतीचे ते बोर्ड वेधत आहे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST2021-06-11T04:20:13+5:302021-06-11T04:20:13+5:30

सिंदेवाही : शहरातील नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छता अभियानांतर्गत बाजार चौक परिसरात डिजिटल लायटिंगचे बोर्ड सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या ...

The Nagar Panchayat board is paying attention | नगरपंचायतीचे ते बोर्ड वेधत आहे लक्ष

नगरपंचायतीचे ते बोर्ड वेधत आहे लक्ष

सिंदेवाही : शहरातील नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छता अभियानांतर्गत बाजार चौक परिसरात डिजिटल लायटिंगचे बोर्ड सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या बोर्डावर ‘आय लव्ह सिंदेवाही’ असे लिहिले आहे. नगरपंचायत अंतर्गत शहरात सौंदर्यीकरण केले जात आहे. यासोबतच वृक्षारोपण, स्वच्छता अभियान तसेच भिंती रेखाटून नागरिकांना संदेश देण्याचे काम नगरपंचायतद्वारे केले जाते. आपल्या शहरावर आपले प्रेम असावे, शहराचे सौंदर्य प्रत्येकाने जपावे, या हेतुतून ‘आय लव्ह सिंदेवाही’ असे लिहिलेले हे बोर्ड नगरपंचायतीने लावले आहे. अनेकांसाठी ते सेल्फी पाॅईंट ठरले आहे.

===Photopath===

100621\img-20210609-wa0082.jpg

===Caption===

नगरपंचायतचे डिजिटल युगातील लक्षवेधी बोर्ड दर्शनीय आकर्षण '' आय लव्ह सिंदेवाही ''

Web Title: The Nagar Panchayat board is paying attention