मुनगंटीवार हे सर्व समाजासाठी काम करणारे लोकनेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:46+5:30

ना. बावनकुळे पुढे म्हणाले, गेली २५ वर्षे सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत आहेत. ते विधानसभेतील सर्वोत्तम आमदार म्हणून गौरविले गेले आहे. राज्यातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. राज्याच्या विकासाला दिशा देणारे सर्वसमावेशक असो अर्थसंकल्प त्यांनी मांडले आहे.

Mungantiwar is the leader of the community | मुनगंटीवार हे सर्व समाजासाठी काम करणारे लोकनेते

मुनगंटीवार हे सर्व समाजासाठी काम करणारे लोकनेते

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : पोंभुर्णा येथे तेली समाज बांधवांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : विकासाप्रति असलेली तळमळ, अमोघ वक्तृत्व, अफाट ज्ञान अशा अनेक पैलुंनी ज्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध केले आहे, असे सुधीर मुनगंटीवार हे सर्व समाजासाठी काम करणारे लोकनेते आहेत. ते जर महाराष्ट्र विधानसभेत नसते तर संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशितच होऊ शकले नसते, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. सोमवारी पोंभुर्णा येथील तेली समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी मंचावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र तैलिक समाज महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुंबईचे शरद तेली, बबनराव फंड, रावजी चवरे, श्रीधरराव बांगडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ना. बावनकुळे पुढे म्हणाले, गेली २५ वर्षे सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत आहेत. ते विधानसभेतील सर्वोत्तम आमदार म्हणून गौरविले गेले आहे. राज्यातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा गौरव झाला आहे. राज्याच्या विकासाला दिशा देणारे सर्वसमावेशक असो अर्थसंकल्प त्यांनी मांडले आहे. महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. चंद्रपूर जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर करण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत. यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले, जेव्हा तेली समाज बांधवांनी हाक दिली तेव्हा ना. मुनगंटीवार यांनी सहकार्याचा हात दिला. समाजाच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या संघर्षामुळेच संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित झाले.
संताजींचे जन्मगाव सदुंबरे तिर्थक्षेत्र म्हणून घोषित झाले, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी रेणूका दुधे, महेंद्र करकाडे, चंद्रकांत धोडरे यांचीही भाषणे झाली. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी व तेली समाज बांधवांच्या अन्य मागण्यांची पुर्तता करण्याबाबत केलेल्या संघर्षाचा प्रवास सांगणाऱ्या ‘गाथा संघर्षाची’ या पुस्तिकेचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
खा. तडस यांनी अर्थमंत्री मुनगंटीवार यांचा सत्कार केला. प्रास्ताविक रमेश पिपरे, संचालन आशिष देवतळे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मनपा सदस्य छबु वैरागडे, अनुराधा हजारे, कल्पना बगुलकर, बापुजी चवरे, चंद्र्रकला बोबाटे, पुष्पा बुरांडे, ज्योती बुरांडे, सुचिता गाले, संजय येनुरकर, चंद्रकांत आष्टनकर, विजय गिरडकर, यशवंत बोंबले, अशोकराव झोडे, अनिल साखरकर, रेखा येरणे, इंदिरा पिपरे, ईश्वर नैताम, गुरुदास पिपरे, अशोक सातपुते, प्रा. दानासुरे आदींसह तेली समाज बांधवांची उपस्थिती होती.

पंतप्रधानांच्या बंधुंनी केले मुनगंटीवारांचे कौतुक
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी व तेली समाज बांधवांच्या अन्य मागण्यांची पूर्तता करण्याबाबत केलेल्या संघर्षाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू सोमाभाई मोदी यांनी मुनगंटीवारांना एक पत्र पाठवून कौतुक केले आहे. जाती आणि समाज यांची सीमा तोडून सर्व समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे प्रशंसनीय काम सुधीर मुनगंटीवार करीत आहेत, त्यांचे हे कार्य खरेच वाखाणण्यासारखे आहे, असे सोमाभाई मोदी यांनी पत्रात म्हटले आहे.

तेली समाजबांधवांच्या पाठीशी - सुधीर मुनगंटीवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास‘ या सुत्रानुसार नेहमीच मी माझ्या परीने जाती, पंथ व धर्माच्या पलिकडे जावून विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे. पोंभुर्णा येथे संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सभागृह उभारण्याची मागणी येथील समाज बांधवांनी केली. त्यासाठी आपण गेल्या महिन्यात ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. पोंभुर्णा येथील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, टुथपिक उत्पादन केंद्र, अगरबत्ती प्रकल्प आपण सुरू केले. या परिसराचा विकास व लोककल्याण यासाठी वचनबद्ध आहे. संताजी जगनाडे महाराज यांचा मानवतेचा विचार अंगिकारून तेली समाज बांधवांच्या सदैव पाठीशी आहे, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

Web Title: Mungantiwar is the leader of the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.