शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राच्या परमवैभवासाठी मुकुंदराव पणशीकरांनी संघसाधना केली

By admin | Updated: December 25, 2016 01:13 IST

राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी साधना म्हणजे संघसाधना होय. राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्याच्या

रमेश पतंगे : मुकुंदराव पणशीकर स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळा चंद्रपूर : राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी साधना म्हणजे संघसाधना होय. राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्याच्या संघसाधनेचे मुकुंदराव हे एक महान साधक होते, असे प्रतिपादन मुंबई येथील रमेश पतंगे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मुकुंदराव पणशीकर यांच्यावरील स्मृतिग्रंथाचा प्रकाशन सोहळा जनता महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पतंगे बोलत होते. मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक जयंतराव खरवडे व धर्मजागरण विभागाचे क्षेत्र संयोजक श्यामजी हरकरे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संघसाधक मुकुंदराव पणशीकर यांच्यावरील स्मृतिग्रंथासोबतच ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकर व राष्ट्रउभारणी’, या ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात आले. पतंगे पुढे म्हणाले की, दुर्दम्य आत्मविश्वास, समत्वाचा मननोभाव, कार्याचा सातत्याने विचार या सर्वांचा आदर्श म्हणजे मुकुंदराव पणशीकर ते उत्तम वक्ते नसले तरी, आपले विचार सुस्पष्ट व ठामपणे मांडत होते. धर्मजागरण, सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषदेचे काम, शबरी कुंभाचे आयोजन, विद्यार्थ्यांचे वसतिगृह महाराष्ट्राच विविध शहरात उभारुन त्यांची व्यवस्था बघणे आदी विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. पुणे येथील भारतीय विचार साधना संस्थेला त्यांनी उर्जितावस्था प्राप्त करून दिली. तसेच डबघाईला आलेल्या जनता सहकारी बँकेला तारुन तिचे भाग भांडवल कसे वाढेल, याची रचना त्यांनी आखून दिली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जयंतराव खरवडे यांनी म्हणाले की, संसार सांभाळून संघाचे कार्य करणे व संपूर्ण वेळ संघ कार्यासाठी देणे, अशा संघाच्या कार्य शैलीच्या दोन व्यवस्था आहे. यात संपूर्ण वेळ संघ कार्यासाठी देणाऱ्यांमध्ये मुकुंदराव अग्रणी आहे. शामजी हरकरे यांनी मुकुंदरावांसमवेत कार्य केल्याची आठवण जागी केली. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन संजय दाणेकर यांनी आणि संचालन समिधा दाणेकर यांनी केले. (प्रतिनिधी)