शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने साधला ३२ हजार ग्राहकांसोबत थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:01 IST

महावितरणने चंद्रपूर जिल्ह्यात ८१ तर गडचिरोली जिल्ह्यात ९८ वेबिनार घेतले. चंद्रपूर जिल्ह्यात ३३ ठिकाणी, गडचिरोली जिल्ह्यात १२ ठिकाणी तक्रार निवारण मेळावे घेतले. महावितरणच्या चंद्रपूर विभागात २४, बल्लारशा विभागात १८, वरोरा ९ तर गडचिरोली आणि ब्रम्हपुरी विभागात प्रत्येकी ७, आलापल्ली विभागात ६ ठिकाणी वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देवीज बिलाचा संभ्रम दूर केल्याचा दावा : सर्व कार्यालयात सुरु केले तक्रार निवारण कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज ग्राहकांना वीज बिल दिले. मात्र यासंदर्भात मोठ्या संख्येने ग्राहकांनी शंका उपस्थित केली. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील २५ हजार ४७१ ग्राहकांनी बिलासंदर्भात तक्रार केली. या तक्रांरीचे निरासरण करण्यासाठी महावितरणच्या सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन केले आहे.वीज बिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह वेबिनारनही घेतले. या माध्यमातून महावितरणने चंद्रपूर आणि गडचिरोलीतील तब्बल ३२ हजार ग्राहकांसोबत संवाद साधला आहे.महावितरणने चंद्रपूर जिल्ह्यात ८१ तर गडचिरोली जिल्ह्यात ९८ वेबिनार घेतले. चंद्रपूर जिल्ह्यात ३३ ठिकाणी, गडचिरोली जिल्ह्यात १२ ठिकाणी तक्रार निवारण मेळावे घेतले. महावितरणच्या चंद्रपूर विभागात २४, बल्लारशा विभागात १८, वरोरा ९ तर गडचिरोली आणि ब्रम्हपुरी विभागात प्रत्येकी ७, आलापल्ली विभागात ६ ठिकाणी वीज ग्राहकांच्या तक्रारींसाठी तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले. ग्राहकांकडून आलेल्या बहुतांश तक्रारी दूर करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. मीटर रिडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल वीज ग्राहकांना देण्यात आले. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. हा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करून शंका निरसन करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे विविध गट तयार करून हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोविड-१९ संदर्भात सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याची माहितीही महावितरण दिली.२५ हजारांवर तक्रारीलॉकडाऊनच्या कालावधीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहकांनी महावितरणकडे अक्षरश: तक्रारींचा पाऊस पाडला. यामध्ये २५ हजार ४७१ नागरिकांनी वीज बिलासंदर्भात आपल्या तक्रारी केल्या.जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणची माहिती देण्यासाठी ग्राहकांसोबत संवाद साधण्यात आला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एकूण २९ वॉट्सअ‍ॅप समूह तयार करून यातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला गेला. अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न आहे.- सुनील देशपांडे,मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

टॅग्स :mahavitaranमहावितरण