शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी धरणाच्या पाण्यात आंदोलन

By admin | Updated: December 20, 2014 22:35 IST

रब्बी हंगामातील पिकांना त्वरित पाणी मिळावे व अंबुजा पाणी करार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी पकडीगड्डम धरणात उतरून जलआंदोलन केले.

पकडीगड्डम धरण : सहा तास शेतकरी उभे होते पाण्यातूनांदाफाटा : रब्बी हंगामातील पिकांना त्वरित पाणी मिळावे व अंबुजा पाणी करार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी पकडीगड्डम धरणात उतरून जलआंदोलन केले. यात पिपर्डा, सोनुर्ली, वनसडी, लोणी, नामा यासह १२ गावातील तब्बल ५०० शेतकरी सहभागी झाले होते. यापैकी ७० ते ८० शेतकऱ्यांनी सहा तास पाण्यात उभे राहून अंबुजा करार रद्द करा, शेतकऱ्यांना पाणी द्या, अशा घोषणा देत आंदोलन केले. सन १९९९ मध्ये अंबुजा सिमेंट कंपनीला पाणी देण्यासंबंधीचा करार करण्यात आला. यामध्ये प्रथम १२ गावातील शेतकऱ्यांच्या २९६८ हेक्टर शेतीला पाणी त्यानंतर पिण्याचे पाणी व सिमेंट कंपनीला उर्वरित पाणी, असा करार आहे. मात्र येत्या काही वर्षात शेतीला पाणी देण्याचे टाळून कंपनीमार्फत धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांचे शेतीचे पाणी पिण्याचे पाणी कंपनीच्या घशात जात आहे. तालुक्यात अमलनाला व पकडीगड्डम ही दोन मोठे धरणे आहेत. जवळपास ४५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. यात काही जमिनीवर वर्धा व पैनगंगा नदीच्या पाण्याचा वापर केला जातो. तर बऱ्याच रोगात बोअरवेल विहिरीमार्फत सिंचन होत आहे. यातच अमलनाला व पकडीगड्डम धरणांतर्गत येणाऱ्या गावांना पाणी न देता सदर विभाग सिमेंट कंपन्यांचे अधिक लाड पुरविताना दिसत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट धरणाच्या पाण्यात उतरून आंदोलन केले.सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेले आंदोलन सायंकाळी ५.३० पर्यंत कायम होते. मात्र एकही सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला उपस्थिती दाखविली नाही. त्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी स्वत: पाण्याचे वॉल्व सुरू करून आंदोलनाची समाप्ती केली. ठाणेदार काळे यांच्या उपस्थितीत पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला व परिस्थिती हाताळली. (वार्ताहर)मागणीकडे सातत्याने दुर्लक्षगेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी संघर्ष सुरू आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, सिंचन विभागाचे अधिकारी, मंत्री यांना वारंवार निवेदन देण्यात आले. नुकतेच कोरपना येथे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी जलआंदोलनाची भूमिका शेतकऱ्यांना घ्यावी लागली. आताही संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसेल तर काही दिवसातच तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.