शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

लोकाईच्या तोंडातला सूर मंजे झाडीबोलीचा रुप

By admin | Updated: December 27, 2015 01:23 IST

आपल्या राज्यात बहुभाषेत लोक बोलतात. तशाचवानी आपल्या झाडीपट्टीची झाडीबोली ही मायबोली हो. या सप्पा बोलीभाषेची लिवायची लिपी मातूर एकच. ते मंजे मराठी हो.

ग.रा. वडपल्लीवार यांचे प्रतिपादन : झाडीबोली साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन रमेश नान्ने पेंढरी(कोके)आपल्या राज्यात बहुभाषेत लोक बोलतात. तशाचवानी आपल्या झाडीपट्टीची झाडीबोली ही मायबोली हो. या सप्पा बोलीभाषेची लिवायची लिपी मातूर एकच. ते मंजे मराठी हो. आपल्या झाडीपट्टीच्या लोकाईच्या तोंडातला सूर मंजे आपल्या झाडीबोलीचा रुप हो, अशा अस्सल झाडीपट्टी भाषेत संमेलनाध्यक्ष ग.रा. वडपल्लीवार गुरुजी यांनी अध्यक्षीय पुष्प गुंफले.कर्मयोगी पूज्य श्री तुमकारादादा गीताचार्य झाडीबोली साहित्य नगरीत आयोजित झाडीबोली साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपती रा. वडपल्लीवार होते. संमेलनाचे उद्घाटन आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे उत्तराधिकारी लक्ष्मणदादा नारखेडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून राजुऱ्याचे माजी आमदार वामनराव चटप, झाडीबोली साहित्य मंडळ साकोलीचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, कार्याध्यक्ष डॉ. राजन जैस्वाल, स्वागताध्यक्ष तथा सरपंच छबु शिंदे, कार्याध्यक्ष व उपसरपंच यादव मेश्राम, विदर्भ वायगाव हळद संघटनेचे माजी सरचिटणीस तथा ज्येष्ठ पत्रकार सदाशिव नान्ने, ज्येष्ठ साहित्यिक व कवी नागो थुटे, बाबुराव टोंगे, विदर्भाच्या बहिणाबाई अंजनाबाई खुणे, दिवाकर मोरस्कर, साकोलीचे माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, डोमाजी कागपते, माजी सरपंच चंद्रकांत शिंदे, भगवान नान्ने, गुलाब चौधरी, हरिभाऊ पाथोडे आदी उपस्थित होते.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ४७ व्या पुण्यतिथी निमित्ताने हे २३ वे झाडीबोली साहित्य संमेलन घेण्यात येत आहे. सकाळी ग्रामसफाई, ध्यान, घटस्थापनेनंतर संपूर्ण गावातून गणपती वडपल्लीवार, डॉ. राजन जैस्वाल यांच्या नेतृत्त्वात पुस्तक पोहा दिंडी काढण्यात आली. यानिमित्त गाव पूर्ण स्वच्छ करण्यात आले होते. उद्घाटन सोहळ्यानंतर ग्रामगीता सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. लिलाधर चुनारकर यांच्या संपूर्ण कुटुंबाने ‘हम सेवक थे’ हे स्वागत गीत सादर केले. झाडीबोलीचे गौरवगित कवी लेकराम शेंडे यांनी सादर केले. प्रास्ताविक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.माजी संमेलनाध्यक्ष प्रा. धनराज ओक यांनी आताचे संमेलनाध्यक्ष ग.रा. वडपल्लीवार यांच्याकडे कारभार सोपवून आपला अनुभव कथन केला. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात वडपल्लीवार यांनी झाडीबोली भाषा व इतर भाषेची उदाहरणासह तुलना करून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रेमदास मेंढूलकर यांनी तर आभार प्रा. भास्कर वाढई यांनी मानले. १५० ते २०० किलोमीटर अंतरावरून कवी, लेखक, साहित्यिक संमेलनासाठी आवर्जुन आले होते, त्यामुळे गावाला यात्रेचे रूप आले होते.