शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी पार पडली सर्वाधिक लग्ने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

विवाह आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग असतो. यामुळे आप्तेष्ट, नातेवाईक सर्वांना विशेषकरून बोलाविले जाते. बहुतांश जण हजेरीही लावतात. मात्र मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रशासनाने विवाह सोहळ्यात उपस्थितीवर बधने घातली. त्यामुळे अनेकांनी आयोजित विवाह सोहळ्याची तारीख पुढे ढकलली. मात्र कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे गेले नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी विवाह उरकण्याकडे अनेकांचा कल आहे.

ठळक मुद्देलाॅन, मंगल कार्यालयांमध्ये लगबग : बॅण्ड पथकांनाही आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून अनेक कुटुंबीयांनी आयोजित विवाह सोहळ्यांच्या तारखा पुढे ढकलल्या. सध्या थोडीफार शिथिलता मिळताच विवाह उरकण्याचा सपाटा  सुरू असून या वर्षातील सर्वाधिक विवाह पार पडण्याचा उच्चांक रविवारी ठरला. यामुळे रविवारी दिवसभर शहरात लगबग बघायला मिळाली.विवाह आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग असतो. यामुळे आप्तेष्ट, नातेवाईक सर्वांना विशेषकरून बोलाविले जाते. बहुतांश जण हजेरीही लावतात. मात्र मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे प्रशासनाने विवाह सोहळ्यात उपस्थितीवर बधने घातली. त्यामुळे अनेकांनी आयोजित विवाह सोहळ्याची तारीख पुढे ढकलली. मात्र कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे गेले नाही. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी विवाह उरकण्याकडे अनेकांचा कल आहे. रविवारी शहरातील लाॅन, मंगल कार्यालये, हाॅटेल आदींमध्ये विवाह सोहळे पार पडले. सकाळच्या वेळी जिकडे जितके बॅण्डचा आवाज गुंजत होता. यामुळे मंगल कार्यालय संचालकांसह, बॅण्ड पथक, कॅटरर्स आदींचा काही प्रमाणात का होईना, फायदा झाला. चंद्रपूर येथील दाताळा मार्ग, नागपूर रोडवरील मंगल कार्यालय, हाॅटेलमध्ये सर्वाधिक लग्ने पार पडली. याशिवाय तालुकास्तरावरही लग्न पार पडले.

कोरोना नियम पायदळी- कोरोना संकटामुळे शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवेशिवाय इतर बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश आहेत. विशेषत: सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंतच बाजार सुरू असतो. असे असले तरी रविवारी पार पडलेल्या लग्नसमंभामध्ये मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळाली. विशेषत : अनेकांनी मास्कसुुद्धा लावले नव्हते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता, नागरिकांनी  दक्षता बाळगणे गरजेचे आहे.

आषाढामध्ये विवाह?- आषाढ महिना हा पावसाचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये बहुतांश जण कार्यक्रम करण्याचे टाळतात. मात्र या वर्षी इलाज नसल्यामुळे लग्न समारंभ आषाढ महिन्यात पार पाडले जात आहेत.

ग्रामीण भागात शेतकरी शेतात व्यस्त - सध्या शेती हंगामाचे दिवस आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या रोवणी, कपाशीचे निंदन, डवरणी, रासायनिक खत देणे आदी कामे सुरु आहे. यासाठी मजुरांची टंचाई आहे. त्यामुळे शेतमजुरांना अतिरिक्त पैसे देवून शेतकरी शेती कामे करीत आहे. दुसरीकडे शहरामध्ये सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू आहे. विशेशत: सुटीच्या दिवशी लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणात आयोजित केले जात आहे.

 

टॅग्स :marriageलग्न