शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरातील एमआयडीसीचा फलक दाखवतोय बेरोजगारांना वाकुल्या

By admin | Updated: March 27, 2016 00:39 IST

तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी चिमूर तालुकास्थळी एमआयडीसीची स्थापना करण्यात आली खरी; ...

राजकीय अनास्था: बोटावर मोजण्याईतके उद्योगसंतोष कुंडकर/राजकुमार चुनारकर चिमूरतालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी चिमूर तालुकास्थळी एमआयडीसीची स्थापना करण्यात आली खरी; परंतु या एमआयडीसीत आजच्या घडीला केवळ तीन उद्योग सुरू आहेत. त्यातील कामगारांची संख्याही पाचशेच्या आत आहे. चिमूर-वरोरा मार्गावर डाव्या हाताला एमआयडीसीचा फलक मोठ्या दिमाखाने उभा आहे. मात्र प्रत्यक्षात एमआयडीसीत उद्योगांची वाणवा आहे. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारांची रोजगार मिळविण्यासाठी कायम भटकंती सुरू असते. एक लाख ६९ हजार १४६ इतकी तालुक्याची लोकसंख्या आहे. ९३ ग्रामपंचायती असलेल्या या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी केवळ पदवीपर्यंत येथे शिक्षणाची सोय आहे. नावाला येथे आयटीआय आहे. त्यातून प्रशिक्षित झालेल्या उमेदवारांना मात्र अन्य ठिकाणी रोजगार शोधत हिंडावे लागत आहे. चिमूर तालुक्यात मुख्य व्यवसाय शेती आहे. भात, सोयाबिन व कापसाचे उत्पादन घेणाऱ्या या तालुक्यात सिंचनाची सोय मात्र नाही. शेतकऱ्यांना सिंचनासाठी कायम निसर्गावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या अशक्त होत चाललेल्या या तालुक्यात मुरपार कोळसा खाण वगळता कोणताही असा मोठा उद्योग नाही. येथे १९९९ मध्ये एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. त्याला आता १६ वर्षे लोटली. मात्र या एमआयडीसीत केवळ तीन उद्योग उभे आहेत. त्यात कुटारावर चालणारा शारदा अंबिका पॉवर प्लॉन्ट, कॉटन इंडस्ट्रीज जिनिंग व एक वेल्डींग वर्कशॉप या उद्योगांचा समावेश आहे. त्यांपैकी पॉवर प्लॉन्टमध्ये ३०० कामगार तर जिनिंगमध्ये २०० च्या आसपास कामगार कार्यरत आहेत. या एमआयडीसीत ३६ प्लॉट आहेत. त्यांपैकी दोन प्लॉट शासनाने आरक्षित केले आहेत. तीन उद्योगाशिवाय अन्य प्लॉट अद्यापही उद्योगाची वाट पाहत आहेत. मात्र राजकीय अनास्थेमुळे येथे उद्योग सुरू झाले नाहीत.