शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST

कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले आता घरच्या घरी राहत आहे. त्यांचा पूर्ण वेळ घरीच जात असल्यामुळे टीव्ही बघणे, मोबाईलवर खेळणे तसेच वाट्टेल तसे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे ते घरातील कामांकडे किंवा आई-वडिलांनी सांगितलेल्या छोट्या-छोट्या कामाकडेही दुर्लक्ष करीत आहे. दिवसभर टीव्ही बघण्यासह आपल्याच आवडीचे कार्यक्रम ते बघत असल्याने घराघरांत सध्या चिडचिडपणा वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. अशावेळी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरू असला तरी अधिक वेळ मुले घरी राहत असल्याने  घराघरांत आता मुले तसेच आईवडिलांमध्ये चिडचिडपणा वाढला आहे. विशेष म्हणजे, मुले शाळेत जात नसल्याने शिस्त कमी झाली असून वाट्टेल तसे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी पालकांचा पारा चढत आहे.कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले आता घरच्या घरी राहत आहे. त्यांचा पूर्ण वेळ घरीच जात असल्यामुळे टीव्ही बघणे, मोबाईलवर खेळणे तसेच वाट्टेल तसे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे ते घरातील कामांकडे किंवा आई-वडिलांनी सांगितलेल्या छोट्या-छोट्या कामाकडेही दुर्लक्ष करीत आहे. दिवसभर टीव्ही बघण्यासह आपल्याच आवडीचे कार्यक्रम ते बघत असल्याने घराघरांत सध्या चिडचिडपणा वाढला आहे. अशावेळी पालकांनी मुलांना समजून घेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केल्यास दोघांचेही मानसिक आरोग्य चांगले राहून कोरोना संकटाच्या काळातही यातून मार्ग निघणे सहज शक्य आहे.

मुलांच्या समस्या- शाळा बंद आहे. त्यामुळे काही मुले ऑनलाईन अभ्यासक्रम करीत आहे. मात्र दिवसभर घरी राहून कंटाळले आहे. मोबाईल, टरव्ही एवढेच त्यांचे सध्या विश्व झाले आहे. त्यामुळे मुलांमध्येही चिडचिडेपणा वाढला आहे. बाहेर जाण्यावरही निर्बंध आले आहे.त काही घरी आई-वडील दोघेही कामावर जातात. अशावेळी दिवसभर त्यांना एकटे रहावे लागत आहे. यामुळे त्यांच्यामध्ये एकाकीपणा वाढला आहे. तर माध्यमिक तसेच वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची चिंता सतावत आहे.

पालकांच्या समस्या- मुले दिवसभर घरी राहत आहे. त्यामुळे  वाट्टेल तिथे घरातील कोणत्याही वस्तू ठेवतात. अनेकांच्या घरात नीटनेटकेपणा राहिलेला नाही. त्यामुळे आई-वडील मुलांना रागावतात. अशावेळी घरात रुसवे-फुगवे वाढले आहेत. टीव्हीवरील कार्यक्रम बघताना मुलांच्या पसंतीचेच कार्यक्रम बघावे लागत आहेत. ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये बहुतांश  घरी मुले आई-वडिलांचाच मोबाईल वापरतात. कामाच्या वेळीच मुले मोबाईल घेऊन राहतात. शाळा नसल्याने अनेकांनी अभ्यास करणे सोडून दिले आहे. त्यामुळे पालकांना ताण वाढत आहे.

डाॅक्टर म्हणतात....मुलांना बाहेर जाण्यावर त्यांच्या आवडी-निवडीवर निर्बंध आले आहे. मित्र -मैत्रिणीसोबत खेळणे बालकांना आवडतात. सध्या ते स्वतंत्र खेळू शकत नाही. त्यांच्या आवडी पालकांनी समजून घेणे सध्या अत्यंत गरजेचे आहे. त्यांना मोबाईल आणि टीव्ही यातून मुक्तता हवी आहे. मुलांच्या मनासारखे होत नसल्याने ते चिडचिडपणा करतात. मुलांच्या आवडी-निवडी ओळखून त्यांना अधिकाधिक आनंदी ठेवण्याचा प्रयत्न पालकांनी करावा. म्हणजे पालक आणि मुलांना दोघांनाही समाधान मिळेल.-डाॅ. गोपाल मुंधडा, बालरोगतज्ज्ञ, चंद्रपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा