गावागावात मानसिक आरोग्यविषय जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST2021-02-10T04:28:29+5:302021-02-10T04:28:29+5:30

मागील काही वर्षांमध्ये वाढत्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्याचे रुग्ण वाढत आहेत. मात्र ग्रामीण भागात याबाबत अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात ...

Mental health awareness in villages | गावागावात मानसिक आरोग्यविषय जनजागृती

गावागावात मानसिक आरोग्यविषय जनजागृती

मागील काही वर्षांमध्ये वाढत्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्याचे रुग्ण वाढत आहेत. मात्र ग्रामीण भागात याबाबत अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नसल्याने अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सौम्य लक्षणे असलेले रुग्ण तीव्र झाल्यानंतर रुग्णालय गाठतात. मात्र यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली असते. यावर वेळीच आळा घालण्यासाठी डॉ. विवेक बांबोळे यांनी दैनंदिन वापरातील कॅलेडरवर मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीपर विश्लेषण करुन प्रकाशित केले आहेत. त्याचे शहरीसह ग्रामीण भागात मोफत वितरण करण्यात येत आहे. यामध्ये मानसिक आरोग्याबाबतचे गैरसमज, मानसिक तणाव, स्किझोफ्रेनिया, चिंता रोग, दारुचे व्यसन, डोकेदुखी, निद्रानाश, वैवाहिक जीवन, ताणतणाव व त्याचे नियोजन, विवेकी दृष्टिकोन याबाबत जनजागृतीपर माहिती दिली आहे. या कॅलेडरचे शहरीसह ग्रामीण भागात मोफत वितरण होत असून मानसिक आरोग्याबाबत जनजागृतीपर माहिती मिळत आहे.

Web Title: Mental health awareness in villages