गडचांदूर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:26 IST2021-02-12T04:26:36+5:302021-02-12T04:26:36+5:30

कोरपना : जेष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूरची सभा नुकतीच महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्त प्राचार्य वामन मत्ते यांच्या अध्यक्षतेखाली ...

Meeting of Senior Citizen Service Organization at Gadchandur | गडचांदूर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेची सभा

गडचांदूर येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेची सभा

कोरपना :

जेष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूरची सभा नुकतीच महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात सेवानिवृत्त प्राचार्य वामन मत्ते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब मोहितकर, डॉ. के. आर. भोयर, रमेश भालेराव, हरिभाऊ मोरे, विठ्ठलराव थिपे, प्रा. अशोक जीवतोडे, नगरसेवक अरविंद मेश्राम, प्रा. प्रदीप परसुटकर उपस्थित होते.

अनेक ज्येष्ठ सदस्यांची वार्धक्याकडे होत असलेली वाटचाल, आजाराचा धोका, कौटुंबिक कलह यासह इतर अनेक समस्यांना अलगद बाहेर ठेऊन समाजाला काही देणं लागते याची जाण ठेऊन समाजहिताचे व ज्येष्ठांच्या आरोग्य विषयक शिबिराचे आयोजन करण्याचे निश्चित केले.

सभेच्या प्रारंभी स्वर्गवास झालेल्या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेला भव्य भवनाची निर्मिती करुन देण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी आमदार सुभाष धोटे यांनी दिल्याने त्यांचे सर्व सदस्यांनी आभार मानले.

अनेक उपयुक्त सूचना व प्रस्ताव संमत झाले. भालेराव यांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मांडले. सेवानिवृत्त प्राचार्य बाळासाहेब मोहितकर यांनी संस्थेच्या सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली.

Web Title: Meeting of Senior Citizen Service Organization at Gadchandur