मथरा पाणी पुरवठा योजना ११ वर्षांपासून तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:00 AM2020-03-16T06:00:00+5:302020-03-16T06:00:34+5:30

राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी, नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले. आजघडीला तब्बल ११ वर्षांचा कालावधी उलटला तरीही ही योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. मध्यंतरी पाणीपुरवठा नळ योजनेच्या टाकीचे स्वीचरूम विषयी गावकऱ्यांत चांगलाच वाद चिघडला होता.

Mathra water supply scheme has been thirsty for 3 years | मथरा पाणी पुरवठा योजना ११ वर्षांपासून तहानलेलीच

मथरा पाणी पुरवठा योजना ११ वर्षांपासून तहानलेलीच

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांची पाण्यासाठी भटकंती : पाण्याच्या टाकीचे बांधकाम रखडले

नितीन मुसळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : माथरा येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण असल्याने गेल्या ११ वर्षांपासून ग्रामस्थांना नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे नागरिकांना आतापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेचा बांधकाम पूर्ण करून योजना सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी, नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम हाती घेण्यात आले. आजघडीला तब्बल ११ वर्षांचा कालावधी उलटला तरीही ही योजना अद्यापही पूर्ण झाली नाही. मध्यंतरी पाणीपुरवठा नळ योजनेच्या टाकीचे स्वीचरूम विषयी गावकऱ्यांत चांगलाच वाद चिघडला होता. मात्र मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. नागरिकांना नळ योजनेचे पाणी मिळावे, यासाठी गावामध्ये नळ योजनेची भूमिगत पाईप लाईन टाकण्यात आली. आता आपल्या घरापर्यंत पाणी पोहचेल म्हणून गावकºयांच्या चेहºयावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र या पाणी पुरवठा नळ योजनेला ग्रहण लागले आणि अधिकाºयांच्या उदासिनतेमुळे ही योजना आजही पूर्ण होऊ शकली नाही. आजघडीला मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या या टाकीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. ग्रापंचायत व पाणीपुरवठा समितीच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा नळ योजनेचे काम सुरू होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेचे हे काम राजुरा येथील पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित केले. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने किमान आता तरी ही योजना पूर्णत्वास न्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. टाकीचे अपूर्ण अवस्थेत असलेले बांधकाम पूर्ण करून तहान भागवावी, अशी मागणी केली जात आहे.

माथरा येथे ११ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले.मात्र अल्पावधीतच या पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले. ग्रामपंचायतीने सबंधित विभागाकडे टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला.मात्र अजूनही टाकीचे बांधकाम अपूर्ण असून तातडीने टाकीचे बांधकाम पूर्ण करावे.
-लहुजी चहारे
सरपंच, माथरा

माथरा पाणीपुरवठा नळ योजनेच्या अपूर्ण असलेल्या टाकीचे बांधकामाची चौकशी करून लवकरात लवकर टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल.
-ए.के. कोटणाके
अभियंता,पाणीपुरवठा विभाग,राजुरा

Web Title: Mathra water supply scheme has been thirsty for 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी