शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरीत अवैध दारू विक्रेत्यांचे जाळे

By admin | Updated: April 1, 2016 01:32 IST

चंद्रपूर जिल्हा दारूबंदीनंतर गोंडपिपरी शहरात दारू व्यावसायिकांचे जाळे पसरले आहे. विना मेहनतीने भरमसाठ कमविण्याच्या लालसेने शेकडोच्यावर दारू व्यावसायिक निर्माण झाले आहेत.

शेकडो विक्रेते : दारू विक्रेत्यांवर पोलिसांची मेहरनजरगोंडपिपरी: चंद्रपूर जिल्हा दारूबंदीनंतर गोंडपिपरी शहरात दारू व्यावसायिकांचे जाळे पसरले आहे. विना मेहनतीने भरमसाठ कमविण्याच्या लालसेने शेकडोच्यावर दारू व्यावसायिक निर्माण झाले आहेत. पोलिसांच्या सहकार्याने हे दारू विक्रेते बनावट दारू विकून नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. गोंडपिपरी शहरातील अनेक तरुण दारूच्या आहारी गेले आहेत. एकशे दहा रुपयाला मिळणारी विदेशी दारू पैशाच्या लालसेने दारूविक्रेते दोनशे पन्नास ते तिनशे रुपयाला विकून तळीरामांची लुट सुरु केली आहे.या दारूविक्रीच्या जाळ्यात गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत अडकले आहेत. काही दारू व्यावसायिक फोनवर घरपोच दारू पोहचवत आहेत तर काही दारु व्यावसायिक पानटपऱ्यांचा देखावा दाखवून पानटपऱ्यातून व्यवसाय सुरु केला आहे. शहरात मोहफूलाच्या दारुपासून तर आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्याचे लेबल असलेल्या विदेशी दारु विकत आहेत. नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यापासून जवळ असताना महाराष्ट्राची दारू गोंडपिपरी शहरात दिसत नाही. मात्र पाचशे ते सहाशे किमी अंतरावर असलेल्या बाहेर राज्याची दारू गोंडपिपरी शहरात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. त्यामुळे सदर विदेशी दारू बनावट की ओरीजनल असे तर्कवितर्क सुरु आहे. सदर दारू प्याल्याने अनेकांना पोटाच्या बिमाऱ्या वाढल्या आहेत. तर अनेक तळीरामांना रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला आहे. शहरातील चौकाचौकात राजरोसपणे दारू विक्री सुरु असताना गोंडपिपरी पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होऊ लागला आहे. रोजची लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल बघता दारू व्यावसायिकांना बड्या पदाधिकाऱ्याचा आशिर्वाद असल्याचे दिसून येते. त्यामुळेच पोलीस मूग गिळून असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलीस दारू विक्रेत्यांवर चार ते सहा महिन्यांनी एखादी केस करुन आपली कॉलर टाईट करुन घेत असल्याचेही अनेकजण बोलत आहेत. मात्र हेच केस दाखल झालेले दारूविक्रेते भविष्यात मोठे डिलर बनणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्यातरी दारूविक्रेत्यांवर पोलिसांची मेहरनजर असल्याचे चित्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)