शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून बाजारपेठची वेळ बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात एकच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. विशेष म्हणजे, सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६० जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले. यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंसह अन्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली होती. या वेळेमुळे चंद्रपूरात नागरिकांची एकच झुंबड उडायला लागली. रस्ते लॉकडाऊनपूर्वीप्रमाणे गर्दीने व्यापू लागले.

ठळक मुद्देपालकमंत्री : गर्दीमुळे नवा पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येत्या गुरुवारपासून बाजारपेठेच्या वेळत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता अशी करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. याबाबतचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी काढतील, अशी माहिती पालकमंत्री मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिली.चंद्रपूर जिल्ह्यात एकच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. विशेष म्हणजे, सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६० जणांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले. यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तुंसह अन्य दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली होती. या वेळेमुळे चंद्रपूरात नागरिकांची एकच झुंबड उडायला लागली. रस्ते लॉकडाऊनपूर्वीप्रमाणे गर्दीने व्यापू लागले. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगही पाळली जात नसल्याची बाब पुढे आली. यावर पर्याय म्हणून बाजारपेठेची वेळ बदलली जाणार आहे.कोरोनाच्या आपत्तीवर मात करण्यासाठी ३८ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीचे नियोजन केले होते. आतापर्यंत जिल्हा नियोजन व खनिज विकास निधीतून २४ कोटी २९ लाखांचा निधी उपलब्ध दिलेला आहे. महानगर पालिकेलाही जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३३ लाख रुपये दिलेले आहे. नगर परिषद व पंचायतींना ७ कोटी ५० लाख रुपये उपलब्ध करून दिल आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिल्याचेही ना. वडेट्टीवार म्हणाले.३०० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणातशहरी, ग्रामीण व मनपा क्षेत्रांमध्ये एकूण १६ हजार १९३ व्यक्ती गृह अलगीकरणात आहे. आतापर्यंत ३९ हजार ५४३ व्यक्तींचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले आहे. संस्थात्मक अलगीकरणात चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात ११०, तालुकास्तरावर १९० असे एकूण ३०० नागरिक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार