शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदासाठी आरक्षण सोडत २६ मार्चला

By admin | Updated: March 14, 2015 01:02 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील पंधराही तालुक्यामध्ये २६ मार्च रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील पंधराही तालुक्यामध्ये २६ मार्च रोजी सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीच्या सन २०१५ ते २०२० या कालावधीकरीता होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुका लक्षात घेता बिगर अनुसुचित क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तालुकानिहाय व गावनिहाय निश्चित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच) निवडणूक अधिनियम १९६४ च्या नियम २ अ (१) (२) नुसार पाच वर्षाच्या कालावधीसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग आणि खुला व महिलांकरिताचा प्रवर्ग आरक्षित ठेवण्यात येणार आहे.शासन निर्णयान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील आरक्षण सोडत २६ मार्च रोजी काढण्याचा अध्यादेश जारी केलेला आहे. दुपारी २ वाजता तालुकास्तरावरील उपलब्ध सभागृहामध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याने कार्यरत व इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सावली येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार वंदना सौरंगपते यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)