शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने अनेक घरांची पडझड

By admin | Updated: April 28, 2015 01:17 IST

काल रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे राजुरा तालुक्यातील अन्नुर, अंतरगाव

विरुर (स्टे.) : काल रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे राजुरा तालुक्यातील अन्नुर, अंतरगाव व खांबाडा येथील सुमारे ३० घरांची पडझड झाली. तसेच अनेक घरांचे छप्पर, कवेलू, टिनपत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील १५ ते २० विजेचे खांब व झाडे कोलमडून पडली. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा काल खंडित होता.राजुरा तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या गाव परिसरात काल सायंकाळी वादळासह जोरदार पाऊस झाला. अन्नुर अंतरगाव येथील वसंता येलमुले, राजाराम लेटकरी, प्रमोद कुळसंगे, गणपत सिडाम, विठ्ठल खेकारे, राजम गोगुलवार यांच्यासह अनेकजणांच्या घरांची पडझड झाली. तसेच सहा विजेचे खांब, विजेची डिपी व घराची पडझड झाल्याने जनावरांना दुखापत झाली. खांबाडा येथील अप्पाजी तुकाराम बाबुलकर, सुरेश शालिकराव चव्हाण, अंकुश दिगांबर वडस्कर, यांच्याही घरांची पडझड झाली. घरांचे टिनपत्रे उडून अंगावर पडल्याने अजय सुरेश चव्हाण, फुलाबाई वडस्कर, गौरुदास वडस्कर हे जखमी झाले. अनेक घरांचे छप्परे, कवेलू, टिनपत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच परिसरातील १५ ते २० विजेचे खांब व झाडे कोलमडून पडली. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे रात्रभर अनेक गावांना अंधाराचा सामना करावा लागला.घटनेची माहिती होताच राजुऱ्याचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, तहसीलदार, पटवारी यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाहणी केली. एक तास चाललेल्या या वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)