शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

माणिकगड पहाडावर नांदू लागली शांतता !

By admin | Updated: April 19, 2015 01:15 IST

सतत दारू पिऊन रस्त्यावरील भांडण-तंटे, वादविवाद, कुटुंबातील छोटे-मोठे कलह,

जिवती : सतत दारू पिऊन रस्त्यावरील भांडण-तंटे, वादविवाद, कुटुंबातील छोटे-मोठे कलह, परिसरात वाढत जाणारी गुन्हेगारी, चोरी, बलात्कार, खून आदी प्रकारामुळे जिल्ह्यातच नव्हे तर ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले होते. दारूबंदीनंतर १५ दिवसांतच जीवती तालुक्यातील माणिकगड पहाडावर शांतता नांदू लागल्याचे चित्र दिसत असून परिसरातील महिला यामुळे समाधानाचे जीवन जगत आहे. गावात कुठलाही समारंभ असला की, हौसेने दारू पिऊन बँड, डिजेच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाईला आवरणे कठिण होऊन बसले होते. नाचण्याच्या कार्यक्रमामुळे विवाहाला विलंब होतच होता.सोबत भांडणेही होत असत. दारूबंदीनंतर हा प्रकार कमी झाला आहे. दारूमुळे परिसरात होणाऱ्या विकास कामासाठी मजुरही मिळत नव्हते. गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने अनेकजण मद्यप्राशन करून भांडण-तंटे करत असत. पहाडावर सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवश्यावर शेती करावी लागते. त्यात वर्षानुवर्षे निसर्गाचा फटका बसत असल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. त्यातून त्यांची व्यसनाधिनताही वाढत होती. त्यातून अशाप्रकारे अनेकांचे संसार उघड्यावर आले. अनेक महिलांचे सौभाग्य हरविले. काहींनी तरुण पणातच आपला जीव गमावला. दारूमुळे महत्त्वाची कामे तर सोडाच पण संसार व पोटच्या गोळ्याकडेही लक्ष देण्याचे भान त्यांना राहत नसे. चांगले संस्काराअभावी भावी पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर असताना श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांनी आंदोलन सुरू केले. त्यांनी केलेल्या दारूबंदीच्या मागणीची दखल घेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात दारूबंदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतल्याने व्यसनाधिनतेला आळा बसण्यासाठी मदत होत आहे. दारूमुळे कंटाळलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. दारूमुळे उद्ध्वस्त होत असलेला संसार सावरण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. (वार्ताहर)