शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; मतदान चिठ्ठी वाटपाचे उद्दिष्ट नियोजनबद्ध पूर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 06:00 IST

या बैठकीमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी व आलेल्या अडचणींबात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ खेमनार यांनी तयारीची माहिती दिली. चंद्र्रपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाबाबतही माहिती त्यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २१ ऑक्टोबर हा मतदानाचा दिवस असल्याची माहिती जिल्ह्यातल्या प्रत्येकाला झाली पाहिजे. त्यासाठी प्रचार-प्रसाराचा वापर करतानाच मतदान चिठ्ठी वाटप अतिशय प्रभावीपणे व राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केंद्र्र प्रतिनिधींमार्फत झाले पाहिजे, असे निर्देश केंद्रीय निरीक्षकांनी रविवारी आढावा बैठकीत दिले.यावेळी निरीक्षक राघवेंद्र कुमार सिंग, गंगाधर बत्रा, अमित चंद्र, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. राजुरा येथील निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर, चंद्र्रपूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर गव्हाड, बल्लारपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर, ब्रह्मपुरीचे निवडणूक निर्णय अधिकारी क्रांती डोंबे, चिमूरचे निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ, वरोराचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.या बैठकीमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी व आलेल्या अडचणींबात आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ खेमनार यांनी तयारीची माहिती दिली. चंद्र्रपूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाबाबतही माहिती त्यांनी दिली. प्रत्येक मतदारसंघातील सखी मतदान केंद्र,पोस्टल बॅलेट, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण व त्यांना देण्याच्या सूचना, निरीक्षकांची नियुक्ती, मतमोजणी केंद्रांवरील उपायोजना, मतमोजणी यंत्राची सरळमिसळ याबाबतचा अहवाल सादर केला. राघवेंद्र्र कुमार सिंग यांनी जिल्ह्यातील सहाही मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर