शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; प्रचारतोफा थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक पक्षांकडून प्रचारफेऱ्यांसह सभांचा धडका सुरू होता. शनिवारी शेवटचा दिवस शिल्लक असल्याने सायंकाळपर्यंतच प्रचार करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचार फेऱ्यांसह भेटीगाठींना ऊत आला आहे. सकाळी सहा वाजेपासूनच उमेदवारांच्या फचारफेऱ्या काढण्याचे नियोजन केले.

ठळक मुद्देनिवडणूक प्रशासन सज्ज : सभा व प्रचारफेऱ्यांचा धडाका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराचा गदारोळ शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रमुख उमेदवारांकडून कॉर्नर सभा व प्रचार फेऱ्यांसाठी जोरदारी तयारी केली आहे. या कालावधीत मतदारसंघात फिरण्यासाठी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी, कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केवळ ६ वाहने वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक पक्षांकडून प्रचारफेऱ्यांसह सभांचा धडका सुरू होता. शनिवारी शेवटचा दिवस शिल्लक असल्याने सायंकाळपर्यंतच प्रचार करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रचार फेऱ्यांसह भेटीगाठींना ऊत आला आहे. सकाळी सहा वाजेपासूनच उमेदवारांच्या फचारफेऱ्या काढण्याचे नियोजन केले. शुक्रवारपर्यंत न पोहचलेल्या गावांना भेटी देण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक शक्ती पणाला लावणार आहेत.जिल्ह्यात ४६३ सखी मतदार केंद्रजिल्ह्यातील सहा मतदार संघात ४६३ सखी मतदार केंद्र राहणार आहेत. या केंद्रातील मतदान प्रक्रिया महिला अधिकारी व कर्मचाºयांद्वारे संचालित केल्या जाणार आहे. यामध्ये राजुरा विधानसभा क्षेत्र २४६, चंद्रपूर १९३, बल्लारपूर २३९, ब्रह्मपुरी ३८, चिमूर ३५५ आणि वरोरा मतदार संघात ४६३ सखी मतदार केंद्रांचा समावेश आहे. शिवाय, जिल्ह्यात १५९ आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.१८ लाख मतदारांना ‘फोटो व्होटर स्लीप’मतदाराला मतदान करणे सुलभ व्हावे, मतदान केंद्र व मतदार यादीतील क्रमांक शोधण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारे जिल्ह्यातील सहा मतदार संघातील १८ लाख ७६ हजार ३५१ मतदारांना घरपोच ‘फोटो व्होटर स्लीप’ पोहचविण्याची कामे जोरात सुरू आहे.१० लाख कुटुंबांना व्होटर गाईडमतदान प्रक्रियेची माहिती मतदारांना व्हावी, याकरिता आयोगाद्वारे माहिती पुस्तिका (व्होटर गाईड) तयार करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १० लाख कुटुंबांपर्यंत ही पुस्तिका पोहचण्यात येत आहे. केंद्रस्तरीय मतदान अधिकाºयांद्वारे पुस्तिका वितरण केल्या जात आहे. २० तारखेपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.१५ उमेदवारांना नोटीसउमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांमार्फत दोन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे निवडणूक खर्च तीनदा तपासण्यात येणार असून खर्च सादर न केलेल्या १५ उमेदवारांना नोटीस बजावल्या आहेत.जवानांच्या सहा तुकड्या दाखलजिल्ह्यातील १८ लाख ७६ हजार ३५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व्हावी, याकरिता केंद्रीय पोलीस दल तसेच निमलष्करी दलाच्या सहा तुकड्या जिल्ह्यात दाखल झाले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर