शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; नव्या सारीपाटावर रंगतोय जुन्याच खेळाडूंचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

गेल्या निवडणुकीतील उमेदवारांमध्ये काँग्रेसचे महेश मेंढे व भाजपचे नाना श्यामकुळे यांचे पक्ष तेच आहेत, परंतु यावेळी किशोर जोरगेवारांना ऐनवेळी काँग्रेसने तिकिट नाकारल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटावे लागले, तर नव्यानेच उदयास येऊन महाराष्ट्रात एक तिसरा पर्याय म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे अनिरूद्ध वनकर रिंगणात आहेत.

ठळक मुद्देचंद्रपूर विधानसभा : नवे समीकरण जुळविण्यासाठी उमेदवारांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांवर दृष्टी टाकल्यास नव्या सारीपाटावर जुन्याच खेळाडूंचा डाव रंगणार असल्याचे चित्र आहे. चारही प्रमुख उमेदवार हे मागील २०१४ च्याच निवडणुकीतील असले तरी पाच वर्षात परिस्थिती फार बदलली असल्याने यावेळी येथून कोण विजयी होईल याची चर्चा आपापल्यापरीने रंगविली जात आहे.गेल्या निवडणुकीतील उमेदवारांमध्ये काँग्रेसचे महेश मेंढे व भाजपचे नाना श्यामकुळे यांचे पक्ष तेच आहेत, परंतु यावेळी किशोर जोरगेवारांना ऐनवेळी काँग्रेसने तिकिट नाकारल्याने अपक्ष म्हणून दंड थोपटावे लागले, तर नव्यानेच उदयास येऊन महाराष्ट्रात एक तिसरा पर्याय म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीतर्फे अनिरूद्ध वनकर रिंगणात आहेत. काँग्रेसच्या एबी फार्मच्या महानाट्यानंतर महेश मेंढे हे काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झालेत. परंतु त्यांच्या प्रचारात काँग्रेस कार्यकर्ते अद्याप ताकदीने उतरल्याचे दिसत नाही. किशोर जोरगेवार मागील पाच वर्षांपासून जनसामान्यांच्या प्रश्नांवर सतत आंदोलने करून सतत चर्चेत होते. आता स्थानिक उमेदवार म्हणून ते मते मागत आहेत. केंद्रात राज्यात व पालिकेत भाजपचे सरकार आणि मजबूत संघटन, यासोबतच सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात विकासकामे केली. यात चंद्रपूर विधानसभा मतदार संघात ही विकासकामे मोठ्या प्रमाणावर बघायला मिळत आहेत. ही बाब भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्यासाठी जमेची ठरत आहे.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी छोट्या छोट्या सतरा पगड जाती समुहांना साद घालून वंचित आघाडीची मोट बांधली. यातील बौद्ध समाज हा पायाभूत मतदार झाल्याने आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. यावर स्वार होऊन अनिरूद्ध वनकर हे वेगवेगळे समीकरण मांडत आहे.किशोर जोरगेवारही बौद्ध-मुस्लीम मतदारांना वळविण्याच्या प्रयत्नात आहेत. महेश मेंढे यांच्यासमोर मात्र काँग्रेसचे परंपरागत मतदार टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.काँग्रेसचे नेते नरेश पुगलिया यांची भेट घेऊन त्यांनी आशीर्वाद मागितल्याचे विशेष सूत्रांकडून कळते. एकंदरीत प्रथमदर्शनी दुरंगी दिसणारी येथील लढत वंचित फॅक्टरमुळे रंगतदार होण्याची शक्यता आहे. काही दिवसात परिस्थिती काय वळण घेते यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर