शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; निवडणूक काळात अधिकाऱ्यांनी कार्यक्षम राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून समन्वयाने काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देत केंद्र संबंधातील व परिसरातील कुठल्याही अडचणींबाबत त्वरित अहवाल सादर करावा. प्रभावीपणे कार्य कराल तर कुठेही निवडणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी अधिक दक्षता व कार्यक्षमतेने पार पाडावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात गुरूवारी सकाळी ११ वाजता क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधित सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करून समन्वयाने काम करावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देत केंद्र संबंधातील व परिसरातील कुठल्याही अडचणींबाबत त्वरित अहवाल सादर करावा. प्रभावीपणे कार्य कराल तर कुठेही निवडणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही. निवडणूक विभागातर्फे अधिकार देण्यात आले आहेत. यांचा वापर निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी करा. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचा सखोल आणि काळजीपूर्वक अभ्यास करावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी खलाटे म्हणाले, विधानसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने दक्ष राहिले पाहिजे. क्षेत्रातील गावे, मतदान केंद्र ईव्हीएम मशिनविषयी सखोल माहिती ठेवावी. अधिकाऱ्यांना निवडणुकीशी संबंधीत कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदान निर्भय वातावरणात होण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याच्या सूचना देण्यात आल्या.बुथ मॅनेजमेंट प्लान तयार करावामतदान दिवसाकरिता बूथ मॅनेजमेंट प्लान तयार करावा. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधांच्या उपलब्धतेसाठी उपाययोजना कराव्यात. मतदान प्रक्रिया निर्भय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करावे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवकांच्या संपर्कात राहून गावनिहाय मतदान केंद्रांचा अभ्यास करण्याचे सूचविण्यात आले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर