शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; कमी मतदान झालेल्या क्षेत्राची वाढविणार टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

२०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५९ हजार १३४ होती. त्यापैकी ११ लाख ६५ हजार ७०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सहा लाख १५ हजार ६३० पुरुष तर पाच लाख ४९ हजार ९७६ महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ६६.७२ टक्के होती. सर्वाधिक मतदान ब्रह्मपुरी मतदार संघात ७४.८३ टक्के मतदान झाले.

ठळक मुद्देमागे वळून पाहताना : सहा विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात चंद्रपूर पिछाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक इतिहासात चंद्रपूर क्षेत्रात २०१४ पर्यंत सर्वाधिक कमी मतदान झाले होते. त्यामुळे येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जागृतीपर विविध उपक्रम सुरू करण्यात आले.२०१४ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या १७ लाख ५९ हजार १३४ होती. त्यापैकी ११ लाख ६५ हजार ७०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात सहा लाख १५ हजार ६३० पुरुष तर पाच लाख ४९ हजार ९७६ महिला मतदारांनी सहभाग नोंदवला. जिल्ह्याची एकूण मतदानाची टक्केवारी ६६.७२ टक्के होती. सर्वाधिक मतदान ब्रह्मपुरी मतदार संघात ७४.८३ टक्के मतदान झाले. त्या पाठोपाठ चिमूर मतदार संघ ७४.५५ टक्के, राजुरा ७०.८३ टक्के, वरोरा ६४.८१ टक्के, बल्लारपूर ६३.१८ तर सर्वात कमी चंद्रपूर विधानसभा मतदार संघ ५४.०७ टक्के मतदान झाले होते. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १८ लाख ७२ हजार ७८७ मतदारांची नोंदणी झाली आहे. एक लाख १३ हजार मतदारांची वाढ झाली आहे. या मतदारांच्या वाढीत २२ मतदार तृतीयपंथी आहेत. एकूण मतदारांमध्ये नऊ लाख ६० हजार ७२७ पुरुष तर नऊ लाख १८ हजार ९३८ महिला मतदारांचा समावेश आहे. २०१९ रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सहा मतदार संघात एकूण ६६.५० टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये राजुरा मतदार संघात ६९.६१ टक्के, बल्लारपूर ६४.१६ टक्के, वरोरा ६३.३५ टक्के, चंद्रपूर ५३.१० टक्के, चिमूर ७३.५२ टक्के, ब्रह्मपुरी ७५.२७ टक्के मतदान झाले होते. आकडेवारी बघितल्यास चंद्रपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी इतर मतदार संघाच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाचे या क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले. जागृतीपर विविध उपक्रम व अभियानाच्या माध्यमातून शहरातील मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता गावागावांत संबंधीत यंत्रणा कार्य करीत आहे.महाविद्यालयांवर लक्ष केंद्रीतचंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी यापूर्वी विशेष प्रयत्न झाले नव्हते. त्यामुळे जिल्ह्याच्या पाच विधानसभा मतदार संघाच्या तुलनेत कमी मतदान झाले. खरे तर या क्षेत्रात चंद्रपूर शहराशी संबंधीत असणारी शेकडो गावे आहेत. शहरातील नवीन विचारांचा परिणाम युवक-युवतींवर होणे अपेक्षित होते. मात्र, उलट प्रकार दिसून आला. यंदा हे चित्र बदलू शकते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर