शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

Maharashtra Election 2019 : झेंडे,दुपट्ट्यांचे महत्त्व वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:00 AM

कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयात वाढली आहे. प्रचार साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमेदवारांना उपलब्ध केल्या जात आहेत.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : शेवटच्या गावापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुठलीही निवडणूक म्हटली की, विविध राजकीय पक्षांतील उमेदवारांचा प्रचार आणि प्रसारावर जोर असतो. तेवढाच प्रचार साहित्यावर सुध्दा असतो. विधानसभा निवडणुकीसाठी अखेरचे काही दिवस उरल्याने सर्वच पक्ष कार्यालयामध्ये तयारीला वेग आला आहे. बैठका, मतदारयाद्या तपासणी, प्रचारसाहित्य वाटप, विविध माध्यमातून कार्यकर्ते, मतदारांशी संपर्क साधण्याचे सत्र अहोरात्र सुरू झाले आहे.कार्यालयीन प्रमुखांसह विविध पदाधिकाऱ्यांची उठबस कार्यालयात वाढली आहे. प्रचार साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. पक्षाकडून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार पक्षाचे झेंडे, जाहीरनामा, बॅनर, बिल्ले, दुपट्टे, पक्षाचे चिन्ह असलेल्या टोप्या उमेदवारांना उपलब्ध केल्या जात आहेत.प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून प्रचार साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांसाठी राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र असलेले फलक, बॅनर उपलब्ध केले जात आहे. आपापल्या पक्षाच्या किंवा सहकारी पक्षाच्या उमेदवारांना आवश्यक ती सर्व मदत, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पक्षीय कार्यालयामार्फत होत आहे.उमेदवारांसाठीचे पक्षीय प्रचार साहित्य हे पक्षाकडून वितरीत केले जात आहे. काही पक्षाच्या उमेदवारांना पक्ष कार्यालयातून तर काहींना थेट उपलब्ध केले जात आहे. मतदार याद्यांच्या तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदारयाद्याचे नियोजन करून प्रत्यक्ष मतदानासाठीच्या बुथनिहाय जबाबदाºया निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.साहित्यावर खर्चप्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांना पक्षाकडून प्रचार साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु साहित्याची कमतरता भासू नये यासाठी काही उमेदवारांनी स्वत: खर्च करून साहित्याची जुळवाजुळव केली आहे. अपक्ष व छोट्या पक्षांच्या उमेदवारांना प्रचार साहित्यावर स्वत: खर्च करावा लागत आहे. मतदार आकर्षित होईल, अशा साहित्याची मागणी अधिक आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर