शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : चार उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:01 IST

राज्यभर २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले होते. परंतु बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील चार उमेदवारांकडून प्रमाणीकरण न करता १३ ऑक्टोबर २०१९ रोजी सोशल मीडिया फेसबुक अकाउंटवरून निवडणुकीचा प्रचार करून आदर्श आचारसंहिता भंग केल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमार्फत उमेदवारांना निवडणुकीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या प्रचार साहित्याचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. प्रमाणीकरण न करता सोशल मीडिया तसेच फेसबुकच्या माध्यमातून प्रचार करणाºया चार उमेदवारांना बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडेकर यांनी सोमवारी नोटीस बजावली आहे.राज्यभर २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले होते. परंतु बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील चार उमेदवारांकडून प्रमाणीकरण न करता १३ ऑक्टोबर २०१९ रोजी सोशल मीडिया फेसबुक अकाउंटवरून निवडणुकीचा प्रचार करून आदर्श आचारसंहिता भंग केल्याचे दिसून आले. त्या कारणाने सोशल मीडिया फेसबुक अकाउंटवरून निवडणुकीच्या प्रचार करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने उमेदवारावर फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये. तसेच त्याबाबत उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट का करण्यात येऊ नये. याबाबतचे लेखी स्पष्टीकरण उमेदवारांनी द्यावे. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित उमेदवारांनी दिले आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करावयाचा असल्यास संबंधित उमेदवाराचे फेसबुक अकाउंट माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमार्फत प्रमाणित करणे आवश्यक आहे. अनेक उमेदवारांनी स्वत:चे सोशल मीडिया अकाऊंटची माहिती अजूनही एमसीएमसी कमिटीला सादर केलेली नाही. जाहिरातीचा प्रसार पूर्वपरवानगीशिवाय करता येत नाही. पूर्वपरवानगी घेण्याकरिता उमेदवारांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी याकडे तसा रितसर अर्ज दाखल करावा. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एमसीएमसी समितीचे नोडल अधिकारी नियुक्त केली असून त्यामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघाकरीता मुख्याधिकारी अर्शिया जुही व उपविभागीय वनाधिकारी अमोल गरकल, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाकरिता चंद्रपूर मनपा जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर रैच, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाकरिता कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी किरण वाढई व सहायक प्रशासकीय अधिकारी नितीन फुलझेले, ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाकरिता बालविकास प्रकल्प अधिकारी कुणाल धुमाळ, चिमूर विधानसभा मतदारसंघाकरिता नायब तहसीलदार संदीप बांगडे, वरोरा विधानसभा मतदारसंघाकरिता तहसीलदार महेश शितोडे यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांनी संबंधित अधिकाºयांकडे पूर्वपरवानगीसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर