शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; चंद्रपूर विधानसभा मतदानाची वाढणार टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 06:00 IST

सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा चंद्रपूर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांना शहरातील व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आतापर्यंत ३० पेक्षा अधिक व्यावसायिकांनी मतदान करणाºया नागरिकांना खरेदीवर १० टक्के सूट जाहीर केली आहे.

ठळक मुद्देमतदार जागृती मोहीम : मतदान करणाऱ्यांना मिळणार व्यावसायिकांकडून सवलती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्र्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता शहरातील व्यावसायिकांनी मतदार जागृतीमध्ये सहभागी होऊन विविध सवलती जाहीर केल्या. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी व्यक्त केला. मंगळवारी शहरातील विविध रेस्टॉरंटला भेट देऊन संचालकांशी चर्चा केली.सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा चंद्रपूर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांना शहरातील व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आतापर्यंत ३० पेक्षा अधिक व्यावसायिकांनी मतदान करणाऱ्या नागरिकांना खरेदीवर १० टक्के सूट जाहीर केली आहे. शहरातील एनडी हॉटेलने मतदान करणाऱ्या ग्राहकांना सवलत जाहीर केली आहे. रसराज बिकानेरवाला आणि इतर २३ रेस्टॉरंट मालकांनी २१ ऑक्टोबर रोजी मतदान करून येणाऱ्या मतदारांना त्यांच्या एकूण खरेदीवर १० टक्के सूट जाहीर केली होती. व्यावसायिकांच्या माध्यमातून स्टिकर, फलक लावण्यासोबतच मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केल्या जात आहे. देशाच्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी डॉ. खेमनार शहरातील अन्य व्यावसायिक प्रतिष्ठानांही भेट देणार आहेत.ही आहेत प्रतिष्ठानेचंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मतदार केल्यास २१ ते २३ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान खाद्य पदार्थांच्या खरेदीवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. शहरातील रसराज रेस्टॉरंट, मेहर रेस्टॉरंट, त्रिमूर्ती रेस्टॉरंट, बाबा रेस्टॉरंट, बिकानेर भुजिया भंडार, श्री कृपा रेस्टॉरंट गोल बाजार, न्यू त्रिमूर्ती रेस्टॉरंट, आनंद स्वीट्स तुकुम, मधुर स्वीट्स बंगाली कॅम्प, माया उपहारगृह गोल बाजार, बिकानेर भुजीयावाला, अन्नपूर्णा स्वीट मार्ट बागला चौक, बिकानेर भुजियावला गोकुलगल्ली, वैष्णवी स्वीट मार्ट गंजवार्ड, लिचिप रेस्टॉरंट, लालजी बीकानेर, महाकाली स्वीट तूकुम, नूतन रेस्टॉरंट, बालाजी बिकानेर, महाकाली वार्ड, राधे स्वीट्स तुकूम, कालिका स्वीट मार्ट, अंकल धाबा या रेस्टॉरंटमध्ये ही सवलत मिळणार आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर