शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

Maharashtra Election 2019 : ‘ईव्हीएम’ सज्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:00 AM

२१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, राजुरा विधानसभा मतदार संघातील निवडणूक कार्यालयात स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट आदी सामग्रीची मतदारसंघनिहाय निवडणूक कार्यालय परिसरात तपासणी केली जात आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : स्ट्राँगरूमसमोर पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाने निश्चित केलेल्या स्ट्राँगरूमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व अन्य सामग्री ठेवण्यात आली. या ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. रविवारी विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक साहित्य वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईव्हीएम मशीन ओके करण्याची प्रक्रियाही सुरू झाली. याचाच भाग म्हणून सोमवारपासून झोनल अधिकाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण दिल्या जात आहे.२१ ऑक्टोबर २०१९ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा, राजुरा विधानसभा मतदार संघातील निवडणूक कार्यालयात स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट आदी सामग्रीची मतदारसंघनिहाय निवडणूक कार्यालय परिसरात तपासणी केली जात आहे. स्ट्राँगरूमध्ये मतदान केंद्रनिहाय प्रत्येक मशिन व इतर साहित्य ठेवण्यात आले. मतदानासाठी सोमवारपासून मशिन तयार करणे सुरू झाले असून मंगळवारपर्यंत पूर्ण होणार आहे. जिल्ह्यात २१ सप्टेंबर २०१९ पासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर जाहिरात करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. काही उमेदवारांनी स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटची माहिती एमसीएमसी कमिटीला सादर केली नाही. त्यामुळे पूर्वपरवानगी घेण्याकरिता उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे अर्ज दाखल करावा, अशी सूचना प्रशासनाने दिल्या.असे होते कंट्रोल युनिट ‘सील’मशिन तयार करण्यासाठी प्रत्येक बॅलेट युनिटवर उमेदवाराचे नाव व चिन्ह असणारे बॅलेट पेपर चिपकविण्यात येणार आहे. उमेदवारांच्या नावासमोरील चिन्हांचे विन्डो खुल्या करून मशिन सिलींग करण्यात येते. त्यानंतर कंट्रोल युनिट जोडून त्या- त्या क्रमांकवर उमेदवार अंतिम करण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर उमेदवाराच्या समोरील बटन दाबल्यानंतर ते बटन दाबलेल्या चिन्हासमोर जाते की नाही, याची ट्रायल घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच सर्व मशिन निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिपत्त्याखाली कंट्रोल युनिट सिल करून ते मशिन मतदानासाठी तयार करण्यात येणार आहे.सहा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीमाध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (एमसीएमसी) सहकार्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघात नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली. राजुरा विधानसभाकरिता मुख्याधिकारी अर्शिया जुही व उपविभागीय वनाधिकारी अमोल गरकल, चंद्र्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी मनपाचे जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर रैच, बल्लारपूरकरिता कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी किरण वाढई व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी नितीन फुलझेले, ब्रह्मपुरीकरिता बालविकास प्रकल्प अधिकारी कुणाल धुमाळ, चिमूर विधानसभाकरिता नायब तहसीलदार संदीप बांगडे, वरोराकरिता तहसीलदार महेश शितोडे हे नोडल ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावणार आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर