शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रेमीयुगुलाचा विवाह

By admin | Updated: November 16, 2015 00:54 IST

दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम. प्रेमातून विवाहाचे स्वप्न रंगविले. मात्र घरच्या मंडळीचा विरोध असल्याने स्वप्न भंगणार असे वाटले.

घुग्घुस : दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम. प्रेमातून विवाहाचे स्वप्न रंगविले. मात्र घरच्या मंडळीचा विरोध असल्याने स्वप्न भंगणार असे वाटले. त्यामुळे दोघांनीही समाज व लोकप्रतिनिधीकडे धाव घेतली आणि त्यांच्या सहकार्याने दोघेही विवाहबध्द झाले.घुग्घुसजवळच्या नकोडा गावातील कमल येलय्या कनकम या युवकाचे घराशेजारी राहणाऱ्या पूजा नरसिंग तांद्रा हिच्याशी गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्यांनी आयुष्यभर एकत्रित राहण्याचे स्वप्न रंगविले. मात्र त्यात घरच्या मंडळीकडून विरोध होत असल्यामुळे आपले स्वप्न भंगणार या भीतीने त्या दोघानीही जि.प. सदस्य ब्रिजभुषण पाझारे, समाज कार्यकर्त्या व ग्रामपंचायत सदस्या ममता उरकुडे यांच्या भेटी घेऊन आपली व्यथा मांडली. त्यांनी गावातील नागरिकांची बैठक घेतली आणि त्या दोघांच्याही आई-वडिलांना बोलवून लग्न लावण्याची समजूत घातल. मात्र त्यांनी विरोध दर्शविल्यामुळे प्रकरण घुग्घुस पोलीस ठाण्यापर्यंत नेले. ठाणेदार सुधाकर अंभोरे यांनी मध्यस्थी केली आणि दोघांनीही लग्नास संमती दिली असता नकोडा येथील जानकीराम मंदिरात विवाह सोहळा पार पडला.यावेळी सरपंच तनुश्रई बांदुरकर, पोलीस पाटील सुमन ठमके, माजी सरपंच ऋषी कोवे, माजी उपसरपंच किरण बांदुरकर, ग्रा.पं. सदस्य अंजया गोनपेलीवार, नरेश एलक्कापेली, आनंद झाडे, कामगार नेता चंदू ताला, रमेश रास्पेली, विकास पाटील, आसम्पेल्ली राजू, कंपा राजया आदी उपस्थित होते. (वार्ताहर)