शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सामाजिक बांधिलकी जपणारे वृत्तपत्र - निकम

By admin | Updated: January 14, 2016 01:33 IST

लोकमत वृत्तपत्र समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असते. हे वृत्तपत्र सामाजिक बांधिलकी जपणारे वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन सावलीचे पोलीस निरीक्षक व्ही.डी. निकम यांनी केले.

सावली : लोकमत वृत्तपत्र समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असते. हे वृत्तपत्र सामाजिक बांधिलकी जपणारे वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन सावलीचे पोलीस निरीक्षक व्ही.डी. निकम यांनी केले. ‘संस्काराचे मोती स्पर्धा’ जरा हटके या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, बालवयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर वाचनाचे संस्कार घडवून त्यातून भारत देशासाठी मोती निर्माण करण्याचा प्रयत्न लोकमत समूह करीत आहे. त्यांच्या या स्पर्धेमुळे बालमनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहीजे, हा त्यामागचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. गुलाबशहा बाबा कॉन्व्हेंट येथे आयोजीत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष डॉ. जलील शेख, प्राचार्य संदीप मेडपल्लीवार, राणी यशोधरा कॉन्व्हेंटच्या प्राचार्य पौर्णिमा गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत प्रथम पारितोषिक राणी यशोधरा कॉन्व्हेंटचा विद्यार्थी रोनित पारस वाळके याला, द्वितीय क्रमांक विश्वशांती विद्यालयाचा तन्मय राधाकीशन नुत्तलवार तर गुलाब शहा कॉन्व्हेंटची विद्यार्थीनी कृतिका शिंदे हिला तृतीय बक्षीस देण्यात आले. प्रास्ताविक उदय गडकरी तर संचालन हर्षा मेडपल्लीवार यांनी तर आभार वंदना रायपुरे यांनी मानले.