शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्ह्यात चार ठिकाणी धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या १२ पेट्या आढळून आल्या. यावेळी दारुसाठा व वाहन असा तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई भद्रावती येथे करण्यात आली. या कारवाईत दोन लाख ८० हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देदहा लाखांचा मुद्देमाल जप्त : पोलिसांची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार ठिकाणी धाड टाकून दारु नऊ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी व रविवारी भद्रावती व चंद्रपुरात करण्यात आली.पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारुविक्रेत्याविरोधात विशेष मोहीम सुरु केली आहे. शनिवारी एका वाहनातून दारुचा साठा येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सापळा रचून लक्ष्मीनगर वडगाव परिसरात कारवाई करण्यात आली.यावेळी वाहनचालक वाहन सोडून पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या १२ पेट्या आढळून आल्या. यावेळी दारुसाठा व वाहन असा तीन लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरी कारवाई भद्रावती येथे करण्यात आली. या कारवाईत दोन लाख ८० हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त करण्यात आला. तर तिसरी कारवाई चंद्रपूर येथील बिनबा गेट परिसरात करण्यात आली.यावेळी एका घरात पोलिसांनी धाड टाकली. घरातील बेसिंनच्या टबखाली ३५५ देशी दारुच्या बॉटल आढळून आल्या. यावेळी सर्व ३४ हजार ५०० रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. तर रविवारी दुपारी बिनबा गेट परिसरात एका इंडिगो गाडीतून २१ पेट्या दारु व वाहन असा दोन लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरील सर्व कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जायले, पद्माकर भोयर, हेड कॉन्स्टेबल भुजाडे, बगमारे आदींनी केली.चिमुरात ६२ हजारांचा मुद्देमाल जप्तचिमूर : पारडपार येथे दारुसाठा असल्याची माहिती चिमूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पारडपार येथील वामन वाघमारे यांच्या घरी धाड टाकून ६२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. पारडपार येथील वामन वाघमारे हा आपला सहकारी सोमेश्वर चौधरी सह दारू विक्री करतो. पोळा सण समोर असल्याने दारूचा साठा लपवून ठेवलेला होता. ही माहिती मिळताच चिमूर पोलिसांनी पारडपार येथील त्या दारू विक्रेत्याच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता ६२ हजार ४०० रुपये किंमतीच्या ६२४ नग देशी दारूच्या १८० मिलीच्या बॉटल आढळून आल्या. मात्र आरोपी फरार झाला. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी मारोती इंगवले, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम, पोलीस शिपाई कैलास आलाम, विनायक सरकुंडे यांनी केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी