लॉकडाऊनमध्ये दारुची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:00+5:30

पहिल्या कारवाईत भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक संतोष तुळजेवार, पोलीस उपनिरिक्षक ठाकूर, शशांक बद्दमवार, सचिन गुरनुले, केशव चिटगीरे, हेमराज प्रधान यांच्या पथकाने बरांज तांडा गावालगतच्या नाल्याजवळ धाड टाकून जंगलझुडपात नाल्याजवळील १५ प्लॉस्टिक ड्रामात सुमारे तीन हजार लिटर गुळ सडवा, दोन प्लास्टिक कॅन २० लि. गुळ असा एकूण सहा लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Liquor sales in lockdown | लॉकडाऊनमध्ये दारुची विक्री

लॉकडाऊनमध्ये दारुची विक्री

ठळक मुद्देतीन ठिकाणी पोलिसांची कारवाई : दहा जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र अवैध दारु विक्रेते याचा फायदा घेऊन छुप्या मार्गाने दारुची विक्री करीत आहेत. याबाबत पोलिसांना माहिती होताच गडचांदूर, भद्रावती व विरुर पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई करुन सुमारे १५ लाख रुपयांचा दारुसाठा जप्त केला. तर दहा जणांना अटक करण्यात आली. बालाजी ईरबलवार राजुरा, प्रदिप रामटेके, कौशल्या पवार, वाल्या राठोड, मोहन राठोड, हिरामण राठोड, रमेश अजमेरा, सर्व रा. धोमापूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
पहिल्या कारवाईत भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक संतोष तुळजेवार, पोलीस उपनिरिक्षक ठाकूर, शशांक बद्दमवार, सचिन गुरनुले, केशव चिटगीरे, हेमराज प्रधान यांच्या पथकाने बरांज तांडा गावालगतच्या नाल्याजवळ धाड टाकून जंगलझुडपात नाल्याजवळील १५ प्लॉस्टिक ड्रामात सुमारे तीन हजार लिटर गुळ सडवा, दोन प्लास्टिक कॅन २० लि. गुळ असा एकूण सहा लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गडचांदूर येथे पोलीस निरिक्षक गोपाल भारती यांचे नेतृत्वात शकील अंसारी, अरविंद, धिरज, कमलेश यांनी केली.पैनगंगा कोसळा खदान मार्गे विरूरकडे जाणाऱ्या पुलाजवळ नाकाबंदी करुन चारचाकी वाहन क्र. एमएच ३४ के ८६७७, दुचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ एझेड ८२८५ वाहनास ताब्यात घेवून दारुसह सात लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर विरुर परिसरात ठाणेदार कृष्णकुमार तिवारी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक सदानंद वडतकर दिवाकर पवार, राऊत, वाघदरकर, विजय मुंडे, सुरेंद्र काळे, भगवान मुंडे, दिनेश गरमले, प्रल्हाद जाधव, संघपाल गेडामा, दीपमाला दुबे यांनी धाड अटक अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करुन सात जणांना अटक केली.

अवैध दारूविक्रीवर बंदी घाला
सावली : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध बनावट दारूची विक्री सुरु आहे. कोरोनाची दहशत असतानासुद्धा मद्यपी दारु पिण्यासाठी सकाळी व संध्याकाळी गर्दी करतात. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यात सुरु असलेल्या दारुच्या अवैध विक्रेत्यांविरुद्ध करवाई करावी, अशी मागणी पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी पोलीस स्टेशन सावली येथे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Liquor sales in lockdown