शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचा खून करणाऱ्या मुलास आजीवन कारावास

By admin | Updated: December 10, 2014 22:54 IST

वडीलांशी भांडण झाल्याने संतप्त होत वडिलांचाच मुलाने खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मामाने मदत केली. या प्रकरणात वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मुलास आजीवन

वरोरा : वडीलांशी भांडण झाल्याने संतप्त होत वडिलांचाच मुलाने खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मामाने मदत केली. या प्रकरणात वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मुलास आजीवन सश्रम कारावासाची तर मामास मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याप्रकरणी एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुरसा गावात बालाजी मंदे राहत होते. बालाजीचा मुलगा अनिल याचे आपल्या वडीलासोबत पटत नव्हते. १० मे २०१३ रोजी मुरसा गावात शंकर गाडगे यांच्या मुलीचा विवाह होता. या विवाहात बालाजी व त्यांचा मुलगा अनिल यांचे भांडण झाले. त्यानंतर अनिलने बालाजींना घरी नेले व घरातील वजनदार लोखंडी बत्त्याने बालाजींच्या डोक्यावर वार केले. यात बालाजींचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बालाजीचा मृतदेह चादरीत गुंडाळून अनिल व त्याचा मामा मोहन चिडे या दोघांनी बैलबंडीने मुरसा गावाजवळील तीन किमी अंतरावर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर टाकून घरी परत आले. भद्रावती पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी मृतदेहाचे निरीक्षण केले असता हत्या झाल्याचा संशय व्यक्त करीत तपास सुरु केला. अनिलला ताब्यात घेतले असता त्याने हत्येची कबुली देत बालाजीला ठार करण्यात वापरलेले हत्यार, चादर पोलिसांच्या स्वाधीन केली. यासाठी मदत करणारा मामा मोहन चिडे यालाही पोलिसांनी ताब्यात घेवून दोषारोपपत्र वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी वकील जयंत ठाकरे यांनी १४ साक्षदारांची तपासणी केली. जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काझी यांनी अनिल मंदे यास आजीवन तर मोहन चिडे याला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. (तालुका प्रतिनिधी)