शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला जाळून मारणाऱ्यास आजीवन कारावास

By admin | Updated: December 18, 2014 22:51 IST

गावातील युवतीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर लग्नास नकार दिल्याने तंटामुक्त समितीने विवाहास बाध्य करून विवाह लावुन दिला. विवाहाच्या पाच महिन्यानंतर पत्नीचा गळा दाबुन हत्या केली

वरोरा : गावातील युवतीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर लग्नास नकार दिल्याने तंटामुक्त समितीने विवाहास बाध्य करून विवाह लावुन दिला. विवाहाच्या पाच महिन्यानंतर पत्नीचा गळा दाबुन हत्या केली व तिला घरातच जाळणाऱ्या पतीस वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.धानोली येथील विकास दडमल असे आरोपी पतीचे नाव आहे. विकासचे गावातील पांडुरंग सोयाम यांची मुलगी सरिता हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. मात्र, विकासने लग्नास नकार दिला. त्यामुळे प्रकरण तंटामुक्त समितीत गेला. मात्र, विकास मानला नाही. त्यामुळे वरोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे विकास लग्नास तयार झाला. वरोरा येथील विठ्ठल मंदिरात विवाह सोहळा पार पडला. सरिता व विकासचा संसार सुरू होता. त्यानंतर विकासने सरिताचा पैश्यासाठी छळ सुरू केला. लग्नाच्या पाच महिन्यानंतर ९ एप्रिल २००८ ला विकासने पत्नी सरिता हिचा घरातील स्वयंपाक खोलीलगत गळा दाबुन हत्या केली व मृतदेह गादीत गुंडाळुन रॉकेलने पेटवुन देत पुरावे नष्ठ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामस्थ व तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आग विझवित पोलिसांना पाचारण केले. वरोरा पोलिसांनी विकास विरूद्ध कलम ३०२, २०१ भादंविने गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर दोषारोपपत्र वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी वकील जयंत ठाकरे यांनी १४ साक्षीदाराची तपासणी केली. जिल्हा सत्र न्यायाधीस ई.एन. काझी यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुन घेतल्यावर विकास दडमल याला कलम ३०२ मध्ये आजीवन कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंड भरला नाही तर ७ वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा तर कलम २०१ नुसार ७ वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)