शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख अधिकाऱ्यांचाच मुख्यालयाला खो

By admin | Updated: December 18, 2014 22:52 IST

आदिवासीबहुल, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील प्रशासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत

चंद्रपूर : आदिवासीबहुल, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व अतिशय मागास समजल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील प्रशासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कामांचा खोळंबा होत आहे. वरिष्ठांनी अनेकदा बजावूनही हे कर्मचारी व अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाला जुमानत नसल्याचे चित्र कोरपना तालुक्यात आहे. कोरपना तालुक्यात ११३ गावे, ५३ ग्रामपंचायती व एक नगर परिषद आहे. तहसिलदार, ठाणेदार हे दोनच अधिकारी वगळता संपूर्ण कार्यालयाचे प्रमुख ‘अपडाऊन’च करणे पसंद करीत आहेत. सद्य:स्थितीत उपकोषागार, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी कार्यालयांचे प्रमुख अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासोबतच येथे असलेल्या तहसिल भूमी अभिलेख, पंचायत समिती, उपकोषागार कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुय्यम निबंधक, एकात्मिक बालविकास प्रकल्प, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय व निमशासकीय शाळांतील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने येथील कार्यालयीन वेळ १२ वाजता पासूनच सुरू होते. कोरपना तालुक्याचे स्थळ असले तरी प्राथमिक सुविधांच्या दृष्टीने अद्यापही परिपूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचारी येथे राहायला तयार नाही. शासकीय सदनिकांमध्ये कोणत्याही सुविधा नसल्याने कर्मचारी, अधिकारी या सदनिकांमध्ये राहणे टाळत आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या सदनिका ओस पडल्या आहेत. या तालुक्याच्या ठिकाणावरुन दळणवळणाची साधने अत्यल्प आहेत. पाल्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या या तालुक्यात पोषक वातावरण नाही. त्यामुळे कोरपनाबद्दल नकारार्थी भाव कर्मचाऱ्यांत आहे. उदरनिर्वाहासाठी नोकरी गरजेची असल्याने कर्मचाऱ्यांपुढे या खेरीज पर्याय नाही. येथील कर्मचारी चंद्रपूर, राजुरा, वरोरा, वणी, भद्रावती, बल्लारपूर, गडचांदूर आदी सोयींच्या ठिकाणांवरुन नियमित ‘अपडाऊन’ करताना दिसतात. दूरगावावरून कामासाठी आलेले नागरिक यात भरडले जात आहेत. एका दिवसांत होणारी कामे १५-१५ दिवस लोटूनही होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढते. कामाची गतीही संथ असल्याने गरजवंतांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तालुक्याचे स्थळ विकसित नसल्याने अनेक कार्यालये येथे नाहीत. त्यामुळे इतर ठिकाणी जाऊन कामे नागरिकांना करावी लागते. यात वेळेचा अपव्यय होतो. सोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. हाती असलेले काम टाकून विनाकारण गैरसोयीच्या सामना करावा लागतो. (प्रतिनिधी)