शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

...तर आंदोलन आणखी तीव्र करू: कामगार संघटना

By admin | Updated: May 12, 2017 02:18 IST

जी.एम.आर. पॉवर कंपनीने चालविलेल्या धोरणावर कामगार नाराज असून वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून

लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : जी.एम.आर. पॉवर कंपनीने चालविलेल्या धोरणावर कामगार नाराज असून वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीच्या व्यवस्थापनाला जागे केले जात आहे. या अगोदर कामगार दिनी टॉवरवर चढून रोष व्यक्त केला होता. परंतु त्याकडेही व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले आहे. फ क्त बैठक घेण्याचे आश्वासन देत आहे. तरीही आम्ही आता शांत बसणार नसून कंपनीच्या विरोधात तिव्र आंदोलनाची भुमिका घेत रास्ता रोको करून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा जी.एम.आर. पॉवर कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी चोखारे म्हणाले, जी.एम.आर. वरोरा एनर्जी ही कंपनी कोळशापासून वीज निर्मिती करीत आहे. ग्राहकांना वीज विकून नफा कमाविण्याच्या व्यवसायात ते गुंतलेले आहे. या कंपनीमध्ये लागणारे कामगार हे अनेक कंत्राटदाराच्या माध्यमातून रोजंदारीवर अतिशय पुर्वग्रहदुषित भावनेने लावलेले आहेत. कामगारांना त्यांचे मुळ हक्क मिळू नये व त्याची आर्थिक, सामाजिक पिळवणूक व्हावी, नोकरीमध्ये सातत्य राहु नये यासाठी व्यवस्थापनाकडून प्रयत्न केला जात आहे. ‘हायर अ‍ॅन्ड फायर’ अशा प्रकारची वागणूक कामगारांना दिली जाते. ही व्यवस्था कंपनी प्रशासनाने नियमाला धरून केलेली नाही. अतिशय दहशतीच्या वातावरणात कामगार काम करीत आहेत. अनेक मुलभुत हक्कापासून कामगार दूर आहेत. बरेचदा व्यवस्थापनाकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष चर्चा झाली. परंतु व्यवस्थापनाने कामगारांच्या हिताच्या विरोधात भुमिका ठेवलेली आहे. चुकीच्या प्रथेचा अवलंब केलेला आहे. हे कायद्याच्या विरोधात आहे, असेही ते म्हणाले. ५ डिसेंबर २०१६ ला आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यांनी १९ डिसेंबर २०१६ रोजी मा. सहायक कामगार आयुक्त कार्यालयात व्यवस्थापन व संघटनामध्ये चर्चा घडवून आणली. त्यामध्ये कामगारांच्या मागण्या व प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचे ठरविले होते. त्यानंतर २९ डिसेंबर २०१६ रोजी चर्चेमध्ये व्यवस्थापक व कामगार संघटना हजर होते. त्यानंतर कमी केलेले कामगार परत घेऊ, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. परंतु तसे झाले नाही. त्यानंतर कामगार आयुक्त यांनी संघटना व व्यवस्थापनाला चर्चेसाठी दुसरी तारीख दिली. मात्र प्रत्येकवेळी व्यवस्थापन गैरहजर होते. त्यानंतर परत २ मे २०१७ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु ती सक्षम अधिकारी नसल्याने ३ मे रोजी घेण्यात आली. परंतु त्यातूनही कोणताच मार्ग निघाला नाही. या सर्व बाबींवरून व्यवस्थापनाला कामगाराप्रति कोणतीच सद्भावना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आम्हाला आंदोलन तिव्र करावे लागत असल्याची माहितीही चोखारे यांनी दिली. येत्या काही दिवसात कंपनीत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. पत्रपरिषदेला कामगार नेते दिनेश दादापाटील चोखारे, सुरेन्द्र बन्सोड, अमोल ढोंगे, अक्षय आंबेडकर, भुषण उमरे, गोपाल सातपुते, रविंद्र काळे, परसराम घाटे आदी उपस्थित होते.