कोरोना काळातही बालकांना श्रमसंस्काराचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST2021-06-10T04:20:05+5:302021-06-10T04:20:05+5:30

आवाळपूर : सगळीकडे कोरोना माहामारीमुळे भीतीचे वातावरण पसरलेले असताना या परिस्थितीमध्ये मुलांना आई-वडिलांना कसे मजबूत करता येईल, याचा विचार ...

Lessons of labor culture for children even during the Corona period | कोरोना काळातही बालकांना श्रमसंस्काराचे धडे

कोरोना काळातही बालकांना श्रमसंस्काराचे धडे

आवाळपूर : सगळीकडे कोरोना माहामारीमुळे भीतीचे वातावरण पसरलेले असताना या परिस्थितीमध्ये मुलांना आई-वडिलांना कसे मजबूत करता येईल, याचा विचार मनात ठेवून ऑनलाईन सुसंस्कार शिबिर घेण्यात आले. जून महिन्यामध्ये कोरोना स्थिती नियंत्रणात आल्याने अनिवासी शिबिराला सुद्धा सुरूवात झाली.

या शिबिरामध्ये जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता धर्माची शिकवण दिली जाते. योगासन, प्राणायम, लाठीकाठी, कराटे, ग्रामगीता यासारखे अनेक प्रयोग केले जातात. शरीर आणि बुद्धी या दोघांचा विकास कसा करता येईल यावर प्रशिक्षण दिले जाते आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १९९८ पासून हे सुसंस्कार शिबिर चालू आहे. कीर्तनाच्या पैशातून ग्रामगीताचार्य डाखरे महाराज यांनी वडगाव येथे संस्कारासाठी आश्रम उभे केले. हे आश्रम सुसंस्कार केंद्र बनले आहे. या शिबिरात प्रमुख शिक्षक डाखरे महाराज, सहाय्यक शिक्षक आकाश मडावी, धनंजय डाखरे यांनी प्रशिक्षण दिले.

===Photopath===

090621\img-20210609-wa0021.jpg

===Caption===

शासनाचे नियम पाडून मुलांना धडे देताना.

Web Title: Lessons of labor culture for children even during the Corona period