शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोरपन्याचा निवडणूक विभाग लिपिकाविना

By admin | Updated: October 5, 2014 23:03 IST

कोरपना येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागामधील लिपिकाची राजुराला बदली झाल्यामुळे पद रिक्त आहे. या ठिकाणी नवीन लिपिकांची नियुक्ती न करण्यात आल्याने निवडणूक विषयक कामे रखडली आहेत.

वनसडी : कोरपना येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागामधील लिपिकाची राजुराला बदली झाल्यामुळे पद रिक्त आहे. या ठिकाणी नवीन लिपिकांची नियुक्ती न करण्यात आल्याने निवडणूक विषयक कामे रखडली आहेत.सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम असल्याने निवडणूक विभागाचे काम वाढले आहे. या विभागात सद्यस्थितीत एक नायब तहसीलदार, संगणक आॅपरेटर व शिपाई हे काम सांभाळत आहेत. मात्र महत्वाचे लिपीक पदच रिक्त असल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त, अतिमागास तालुक्याची प्रशासन व्यवस्था आॅक्सिजनवर चालली असल्याचे दिसते. जबाबदारी येऊन ठेपली असल्याने रात्रंदिवस एक करुन नायब तहसीलदार, संगणक आॅपरेटर, लिपीक आपली कामे उरकविण्याचा प्रयत्न करत आहे. कर्तव्यदक्षतेमुळे त्यांचे जेवढे कौतुक करावे, तेवढे कमी आहे. या निवडणूक विभागातील महिन्याभरापूर्वी संगणक नादुरुस्त होता. तो दुरुस्त करण्यात आला असला तरी प्रिंटरची वाणवा आहे. नादुरुस्त अवस्थेत असलेल्या प्रिंटरमुळे मिळेल त्या ठिकाणावरून प्रिंटर आणण्याची नामुश्की कर्मचाऱ्यांवर ओढवली आहे.लिपीकाअभावी माहिती वेळेवर मिळू शकत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागाते आहे. निवडणूक विभागात ओळखपत्र तयार करणे, मतदार नोंदणी, मतदार नाव शोध, वोटर स्लीप आदि महत्वाची कामे केली जातात. परंतु आवश्यक यंत्रणेअभावी विभागातील कामे रेंगाळली आहेत.निवडणूक विभागातील तांत्रिक समस्या व लिपिक पदभरती त्वरीत करुन या कार्यालयाची रखडलेली कामे मार्गी लावली, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)