शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धाडसी चोरीत सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास

By admin | Updated: December 12, 2015 03:21 IST

येथील अभियंता कॉलनी परिसरात गुरूवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक

चंद्रपूर: येथील अभियंता कॉलनी परिसरात गुरूवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोरी व दरोड्याच्या घटनांनी शहरातील नागरिक हादरून गेले असताना गुरूवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेने नागरिकांच्या दहशतीत भर घातली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचे ज्येष्ठ बंधू तथा सेवानिवृत्त कृषी अधिकारी शशिकांत वैद्य हे त्यांच्या कुटुंबासह नागपूर येथे गेले असता गुरूवारी रात्री चोरट्यांनी डाव साधला. शशिकांत वैद्य हे स्थानिक अभियंता कॉलनीतील सेदानी यांच्याकडे किरायाने राहतात. अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश मिळविला व घरातील कपाटात ठेऊन असलेल्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम असा एकूण सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शुक्रवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रात्रीच्या गस्तीसाठी पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचाही नागरिकांचा सूर आहे. पोलिसांनी शहरातील विविध भागात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)