शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

ंआता लक्ष मनपा निवडणुकीकडे !

By admin | Updated: February 26, 2017 00:38 IST

जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, निकालाची उत्सुकता संपली आहे. मिनी मंत्रालयातील राजकीय सारीपाट स्पष्ट झाला आहे.

मनपा हद्दीत नव्याने मोर्चेबांधणी : मिनी मंत्रालयाची रणधुमाळी थांबलीचंद्रपूर : जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी, निकालाची उत्सुकता संपली आहे. मिनी मंत्रालयातील राजकीय सारीपाट स्पष्ट झाला आहे. भाजपाने झेंडा रोवला आहे. आता चंद्रपूरकरांचे लक्ष मनपा निवडणुकीकडे लागले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून बोध घेत आता काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी नव्याने व्युहरचना आखणे सुरू केले आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूणच आता सर्व पक्षांनी जिल्हा परिषद निवडणुकीची मरगळ झटकून मनपा निवडणुकीकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे.जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी २३ फेब्रुवारीच्या निकालानंतर थांबली आहे. भाजपाने जिल्हा परिषदेच्या ५६ जागांपैकी ३३ तर पंचायत समितीच्या ११२ जागांपैकी ७१ एवढ्या जागांवर वर्चस्व सिध्द केले. मिनी मंत्रालयात भाजपाची सत्ता बसेल, हे निर्विवाद आहे. या निवडणुकीत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांना चांगलाच हादरा बसला. या पक्षांवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आता चंद्रपूर महानगरपालिकेचीही निवडणूक तोंडावर आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या चुकांची मनपा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नव्याने व्युहरचना करण्यात व्यस्त झाले आहेत. प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर पदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात फिरणे सुरू केले आहे. भल्या सकाळीच हे नगरसेवक आता वॉर्डात नागरिकांशी संवाद साधताना दिसून येत आहे. एकूणच चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होईल, असा अंदाज आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३३ प्रभाग पाडण्यात आले होते. या ३३ प्रभागातून ६६ नगरसेवक निवडून द्यायचे होते. याप्रमाणे मतदारांनी एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले. मात्र यावेळी यात बदल झाला आहे. २२ डिसेंबर २०१६ रोजी चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी शासनाने पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल केला आहे. सध्या अस्तित्वात असलेले ३३ प्रभाग मोडीत काढून नव्याने १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात १७ प्रभागापैकी १५ प्रभागात प्रत्येकी चार नगरसेवक तर उर्वरित दोन प्रभागात तीन नगरसेवक, असे एकूण ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.प्रभाग रचना व प्रभागातील आरक्षण डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आले. त्यानंतर महापौर पदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण पुन्हा ओबीसी महिलांसाठी राखीव आल्याने महापौर पदाचे स्वप्न बघणाऱ्या पुरुष उमेदवारांचा स्वप्नभंग झाला आहे. त्यांना पुन्हा पुढील अडीच वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने विद्यमान महिला नगरसेविका व काही नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात फेरफटका मारणे सुरू केले आहे. कधी नव्हे ते भल्या सकाळीच हे नगरसेवक वॉर्डात नागरिकांशी बोलताना दिसत आहे. आपली केलेली कामे सांगतानाच विरोधक कसे विकासकामे करताना पाय खेचतात, हेही आवर्जुन सांगताना दिसत आहेत. यंदा प्रभाग रचनेत बदल झाल्यामुळे पूर्वीच्या प्रभागात अनेक नवा परिसर समाविष्ट झाला आहे. त्यामुळे नव्या परिसरात जाऊन विद्यमान नगरसेवक तेथील नागरिकांमध्ये जनसंपर्क वाढविताना दिसत आहे. यासोबतच जिल्हा परिषद निवडणुकीवरून बोध घेत इच्छुक नगरसेवकांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (शहर प्रतिनिधी)एकटे लढणार की आघाडी करणार ?विधानसभेचे उपगेटनेता आमदार विजय वडेट्टीवार यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे १५ नगरसेवक व काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठकही यापूर्वी पार पडली. या बैठकीत काँग्रेसजणांनी कुणाशीही आघाडी न करता मनपाच्या सर्व ६६ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला हात पत्कारावी लागली. त्यामुळे या मनपा निवडणुकीत आघाडी करून निवडणूक लढविणार काय, याबाबतचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.