शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

तेंदू हंगामातील मजूर असुरक्षितच

By admin | Updated: May 22, 2015 01:24 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तेंदू हंगाम सुरू असून या कामी जिल्ह्यातील मजूर मोठ्या संख्येत गुंतला आहे.

कंत्राटदारांकडून करारनाम्याचा भंग: मजूर कायदा कागदावरच, वनविभागाचे बोट कंत्राटदाराकडे गेवरा: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तेंदू हंगाम सुरू असून या कामी जिल्ह्यातील मजूर मोठ्या संख्येत गुंतला आहे. काही मजूर जिल्ह्याच्या बाहेर तर काही राज्याबाहेर तेंदू मजुरीसाठी स्थलांतरीत होत आहे. परंतु या हंगामातील काम करणाऱ्या सर्व मजुरांना कायद्याने दिलेली सुरक्षा तथा त्यांच्या हक्कांची जाणिव मात्र संबंधित कंपनी प्राधिकरण तथा प्रशासन पातळीवर करुन दिल्या जात नसल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. तेंदू हंगामात गुंतलेल्या ग्रामीण मजुरांचा विमा सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आहे. वर्षातून एकदाच मिळणाऱ्या परंतु दोन पैसे अधिकचे उत्पन्न देणारा हंगाम म्हणून या हंगामाची ओळख आहे. या व्यवसायाकडे ग्रामीण कुटुंबाचा कल अधिक आहे. हे खरे असले तरी दोन पैसे मिळविण्याच्या लगबगीत आपल्या अधिकारापासून वंचित असलेल्या मजुरांची दखल घेणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने तेंदूपत्ता संकलनासाठी नेमलेली कंत्राटदार कंपनीदेखील या प्रश्नी गंभीर नसणे ही बाब संयुक्तिक नसल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. मजूर कायद्याचे उल्लंघन व केलेल्या करारनाम्याचा भंग करणारा प्रकार तेंदू कंपन्याकडून होतांना दिसतो आहे. तेंदू मजुरांकडून हंगामी कामासाठी नोकरनामे करुन घेतल्या जातात, तर काही मजूर तोंडी कराराने तेंदूपत्त्याचे संकलन करतात. त्यामुळे अशा मजुरांना कंपनी कायद्याच्या कक्षेत आणता येत नाही. याचाच फायदा तेंदू कंपन्यांना होतो. मात्र ग्रामीण मजुरांचा बळी जातो. हा हंगाम वनातील असल्याने यामध्ये काम करणारा प्रत्येक मजूर असुरक्षित आहे. वनातील हिंस्त्र पशु, सरपटणाऱ्या प्राण्यांपासून या मजुरांना कायम धोका असतो. मात्र कंत्राटदारांकडून मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. मजूरांच्या विमा सुरक्षेबाबत वनविभागास विचारले असता, वन विभागातील अधिकारी संबंधित कंपनीकडे बोट दाखवित आहेत. जबाबदारी कुणाचीही असो तेंदू मजुरांना विमा संरक्षण देणे गरजेचे असून नैसर्गिक समस्या, हिस्त्र प्राण्यांचे हल्ले, झाडावरुन पडणे, साप विंचू चावून मृत्यू तथा अपंगत्व येणे, यासाठी मदत देणे गरजेचे असताना तसे होत नाही. कुणाचे कुटुंब प्रमुख, कुणाचा भाऊ, कुणाचा काका, कुणाची आई, कुणाचे वडील अशा समस्यांनी ग्रस्त आहेत. अनेक कुटुंबाचा आधार हिरावल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. वनविभागाच्या करारनाम्यांव्यतिरिक्त तेंदू कंपनीकडून मजुरांच्या प्रश्नाबरोबर, तेंदू महसूलाचे वाटप हा सुद्धा प्रश्न प्रलंबीत आहे. या प्रक्रियेत यंत्रणेतील अनेकांनी आपल्या डोळ्यावर पट्या बांधल्या आहेत. दृष्टी असून आंधळ्याची भूमिका संबंधीत प्रशासनाकडून होणे ही बाब शोषणास मुकसंमती दर्शविणारी असल्याचे संकेत आहेत. याकडे शासनाने लक्ष देऊन मजुरांच्या समस्या सोडवाव्या, अशी मागणी आहे. (वार्ताहर)