शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप तोंडावर; मात्र कापूस शेतकऱ्यांच्या घरीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी अगदी संथगतीने सुरू असून शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे पांढरे सोने अजूनही घरातच लॉकडाऊन झाले आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी सीसीआयने केवळ नाममात्र कापूस खरेदी केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक अडचणीत : बियाणे घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : जून महिना सुरू झाला तरी शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच लॉकडाऊन असल्याने बहुतांश शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांकडे बियाणे घेण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.राजुरा येथे सीसीआय कापूस खरेदी अगदी संथगतीने सुरू असून शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून बहुतांश शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे पांढरे सोने अजूनही घरातच लॉकडाऊन झाले आहे. महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी सीसीआयने केवळ नाममात्र कापूस खरेदी केली आहे. सीसीआयला नोंदणी केलेल्या सात हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी ताटकळत बसण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे सीसीआयचा झोल कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.कोरोनाच्या जागतिक संकटामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी बहुतांश शेतमाल घरीच भरून ठेवला आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात कापूस खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे साडेसात हजारापेक्षा जास्त शेतकºयांनी नोंदणी केली. मात्र दरदिवशी फक्त मोजक्याच शेतकऱ्यांच्या कापूस गाडया सीसीआयला विक्रीसाठी परवानगी दिल्याने व राजुरा येथील केवळ एकाच कापूस जिनिंगवर मोजकीच कापूस खरेदी केल्याने आजही कापूस विक्रीसाठी शेतकरी प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राजुरा येथे सीसीआयने सुरू केलेली कापूस खरेदी नाममात्र असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांसमोर पैशांची अडचणराजुरा येथील जिनींंगवर सीसीआयने शासकीय कापूस खरेदी सुरू केली खरी, मात्र सीसीआयच्या अनागोंदी कारभारामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जून महिना सुरू झाला तरी कापूस खरेदी झालेली नाही. शासनाला शेतकऱ्यांचा कापूस घ्यायचा आहे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीक विकलेच नसल्याने शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. हाती पैसा होता तो लॉकडाऊनच्या काळात खर्च झाला. आता शेतकऱ्यांसमोर पैशाची मोठी अडचण आहे.

खरीप हंगाम करायचा कसा?शेतकऱ्यांचा शेतमाल अजूनही घरीच असल्याने शेतकऱ्यांना पैशाची अडचण जाणवू लागली आहे. राजुरा येथे एकाच जिनींगवर सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस खरीच आहे. आता पुढचा खरीप हंगाम कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पहिल्यांदाच जून महिन्यापर्यंत शेतमाल घरीच ठेवण्याची वेळ यंदा आली आहे, अशी खंत गोवरी येथील शेतकरी प्रभाकर जुनघरी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरी