शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये खरिपाच्या मशागतीला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे होत्याचे नव्हते केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकºयांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतल्या जाते.

ठळक मुद्देहंगामासाठी धडपड सुरुच: आर्थिक नियोजनासाठी शेतकऱ्यांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरानाच्या सावटातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. काही शेतकरी पारंपारिक पद्धतीने तर काही ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची नांगरनी, वखरनी करीत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने रब्बी पिकांचे होत्याचे नव्हते केले. दरम्यान, अवकाळी पावसाने तर यावर्षी शेतकºयांचे पुरते कंबरडेच मोडले आहे. या संकटातून सावरत पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतल्या जाते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात कापूस भरून आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.खरीप तसेच रब्बी हंगामही तोट्यात गेल्याने यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पुढील हंगामावार सर्व मदार आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील शेतीची मशागतीच्या कामाला लागले आहे.आधुनिक पद्धतीला पसंतीदिवसेंदिवस शेती करणे कठिण झाले आहे. पारंपारिक पद्धतीने शेती केल्यास बैलजोडी,चारा, शेती साहित्य आदी घ्यावे लागते. त्यामुळे आता शेतकरी कमीत कमी त्रासामध्ये शेतकरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत आहे. मात्र प्रत्येक शेतकºयांनाच आधुनिक पद्धतीने शेती करणे शक्य नसल्याने ते कमी पैशामध्ये पारंपारिक पद्धतीनेच शेतीची मशानगत करीत आहे.लॉकडाऊन, अवकाळीने कंबरडे मोडलेयावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पिछा सोडला नाही. प्रथम खरीप आणि त्यानंतर रब्बीनेही होत्याचे नव्हते झाले. यातून कसेबसे सावरत नाही तोच लॉकडाऊन झाले आणि त्यांना जराशीही हालचाल करता आली नाही. परिणामी पुढील हंगाम कसा करायचा, हा प्रश्न सध्या शेतकºयांना पडला आहे. दुसरीकडे अनेक शेतकºयांना आपल्याकडील पीकविलेले धान्य तसेच कापूसही विकता आला नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती