शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वातीसाठी विद्यार्थ्यांनी काढला कँडल मार्च

By admin | Updated: October 8, 2015 00:37 IST

येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील आत्ममहत्या करून जीवन संपविणारी विद्यार्थिनी स्वाती सतीश निकुरे हिच्या समर्थनार्थ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी ....

ब्रह्मपुरी : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील आत्ममहत्या करून जीवन संपविणारी विद्यार्थिनी स्वाती सतीश निकुरे हिच्या समर्थनार्थ तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी शहरातून शांतमय कॅडल मार्च काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या या एकतेमुळे प्रकरणाची गंभीरता आणखी वाढलेली दिसून येत आहे. दरम्यान, तीनही आरोपी मात्र अद्यापही पोलिसांना गवसलेले नाही.४ आॅक्टोबरच्या रात्री १२ वाजून ४ मिनिटानी स्वातीने लिहून ठेवलेल्या नोटमध्ये ‘मेश्राम सर, माझ्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलीला ठेवून बघा, तर तिलाही माझ्यापेक्षा जास्त दु:ख होईल, अशी तुमची भाषा होती. या दु:खामध्ये शाहरुख अली सय्यद व रजत जिभकाटे हे तेवढेच कारणीभूत आहेत. माझ्या संपूर्ण आयुष्यात असे बोललेले मी कधी ऐकलेले नाही. त्यामुळे मला ते सहन होत नाही. कॉलेजमध्ये जाण्याची हिंमत माझ्यामध्ये राहिलीच नाही. सॉरी आई बाबा मी तुमचे स्वप्न साकार करु शकत नाही. तुमचीच (नमू) स्वाती निकुरे’ असा उल्लेख आहे. या संपूर्ण वाक्यामध्ये गांभीर्य दडलेले असल्याने विद्यार्थी वर्ग पेटून उठला आहे. प्राध्यापकाविषयी प्रचंड चिड केवळ स्वातीच्या मनातच खदखदत नव्हती तर सबंध विद्यार्थ्यांत ती खदखदत असल्याने विद्यार्थ्यांनी मृतदेह उचलण्यास केलेला मज्जाव, अंत्यविधीसाठी १२५ कि.मी पर्यंत जाण्याची विद्यार्थ्यांनी केलेली धडपड व मंगळवारी सायंकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांनी काढलेला मूक कॅडल मार्च आदी भूमिकेवरुन या प्रकरणाची तीव्रता दिसून येत आहे. मात्र घटनेला दोन दिवस लोटूनही तिन्ही आरोपी पोलिसांना गवसलेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ब्रह्मपुरीचे सुजाण पालक या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करीत आहेत. म्हणजे हे प्रकरण केवळ तिघांवर अवलंबून नसून यात अनेकांचे प्रत्यक्ष संबंध असले पाहिजे, असे मत व प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी हे प्रकरण निपक्षपाताने हाताळून विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत आरोपींना कुठलेही अभय न देता हातळावे अशी विद्यार्थ्यांसह पालकांची मागणी आहे. (प्रतिनिधी) अटकपूर्व जामीनसाठी आरोपींचा अर्जदोन दिवस लोटूनही आरोपी पोलिसांना गवसलेले नाही. त्यांचा अद्याप थांगपत्ता नसला तरी आरोपींच्या वकिलाने बुधवारी चंद्रपूरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर गुरूवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.