शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘जय श्रीराम’चा निनादला गजर

By admin | Updated: March 29, 2015 01:10 IST

विविध देखावे, ढोलताशाचा गजर, फटक्यांची आतिषबाजी, ध्वनीक्षेपकांवर अविरत सुरू असलेली श्रीराम भजनमाला, ...

चंद्रपूर: विविध देखावे, ढोलताशाचा गजर, फटक्यांची आतिषबाजी, ध्वनीक्षेपकांवर अविरत सुरू असलेली श्रीराम भजनमाला, अशा भक्तमय वातावरणात श्रीरामाच्या जयघोषात निघालेल्या प्रभु रामचंद्राच्या शोभायात्रेने शनिवारी चंद्रपूर दुमदुमले. श्री रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी श्री काळाराम मंदिरात अतिशय श्रध्दापूर्वक पूजा करण्यात आली. सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेच्या स्वागतासाठी महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग अक्षरश: सजविण्यात आले होते. दर १०-१२ फुटांवर विविध सामाजिक संस्थेतर्फे स्वागत गेट उभारण्यात आले होते. रस्त्यांच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी ६ वाजता येथील श्री काळराम मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ही शोभायात्रा गांधी चौकात पोहचली. प्रभु राम आणि सिता, राम-लक्ष्मण यांना खाद्यांवर बसविलेले हनुमान आदी अनेक देखावे लक्ष वेधून घेत होते. ढोलताशाच्या गजरात भाविकांचे पायही थिरकताना दिसत होते. सर्वधर्म समभाव व समरसतेचे प्रतिक ठरणाऱ्या या शोभायात्रेत भाविकांसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्गावर प्रभु रामचंद्राच्या पूजेची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी भाविकांचे स्वागत करण्यात येत होते. सन्मित्र चौकात सन्मित्र मंडळ, जैन भवनासमोर व्यापारी मित्र मंडळ आदींनी शोभायात्रा पोहचताच श्रीरामांची विधीवत पूजा केली. गांधी चौक ते जटपुरा गेट आणि कस्तुरबा मार्गावरून जटपुरा गेट ते गिरनार चौकापर्यंत विद्युत रोषणाई केली होती. विविध सामाजिक संघटनांतर्फे भाविकांसाठी महाप्रसाद, शरबत व पाण्याचे वितरण करण्यात येत होते. यशस्वीतेसाठी शोभायात्रा समितीचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत होते. (नगर प्रतिनिधी)