शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

जाधव कुटुुंबीयांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या

By admin | Updated: November 6, 2014 22:53 IST

पुरोगामी महाराष्ट्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील दलित कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी, या मागणीसाठी सावली

मागणी : सावली तालुका रिपाइंच्यावतीने धरणे व निषेध आंदोलनउपरी : पुरोगामी महाराष्ट्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील दलित कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी, या मागणीसाठी सावली येथे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया तालुका सावलीच्या वतीने निषेध व धरणे आंदोलन करण्यात आले. रिपाइं चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष नेताजी बुरचुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या धरणे आंदोलनात उपस्थित सर्वच नागरिकांनी गुन्हेगारांना पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.सावली तालुक्यातील कापसी येथे सिद्धार्थ खोब्रागडे व त्यांच्या पत्नीवर गावातीलच काही नागरिकांनी हल्ला करुन मारहाण केली. मात्र हल्लेखोरांवर कोणतीच कार्यवाही झाली नाही. या प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्यात यावी, शिवाय कोंडेखल, घोडेवाही, किसाननगर व भट्टीजांब येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यास दिरंगाई केल्याने व अतिक्रमीत जमीनधारकांना पैसे घेऊन पाणी दिले आणि सिंचन लागू असलेल्या २०० ते २५० एकर शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सावली येथील सिंचाई उपविभागाचे अभियंता बांडे व शाखाधिकारी धात्रक यांना निलंबित करण्यात यावे, त्यांच्याकडून नुकसान झालेल्या शेतीची नुकसानभरपाई वसुल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.शिष्टमंडळाने सावलीचे तहसीलदार यांच्या मार्फतीने राज्यपाल मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात चंद्रपूर रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष नेताजी बुरचुंडे, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, चंद्रपूरचे महासचिव गोपाल रायपूरे, संघटन सचिव प्रदीप रामटेके, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत खुशाल तेलंग, विदर्भ प्रदेशचे महासचिव सिद्धार्थ सुमन, गडचिरोलीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शांताराम उंदिरवाडे, पिरिपा गडचिरोलीचे अध्यक्ष मुनेश्वर बोरकर, सावली तालुका अध्यक्ष दे. रा. बोरकर, सचिव किशोर उंदिरवाडे, संघटक देवीदास भैसारे, भद्रावतीचे अध्यक्ष संतोष रामटेके, महिला आघाडी अध्यक्षा इंदू बोरकर, कार्याध्यक्ष छाया कांबळे, कपील खंडारे, भजनदास आलेवार, आकाश सहारे, बालाजी उरकुडे, वासंती गोवर्धन, सिद्धार्थ खोब्रागडे, वर्षा खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)