बिबट घरात घुसल्याने देवडोंगरीत खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:00 AM2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:36+5:30

या घटनेनंतर लगेच वन विभागाने देवडोंगरी परिसरात चार कॅमेरे लावले आहे. वासेरा हद्दीतील वासेरा जायमाळा मार्गालगत देवडोंगरी येथे ४० घरांच्या वस्ती आहे. किशोर शेंडे यांच्या घरी रात्री ११ वाजता बिबट्याने घुसून कुत्राला जखमी केले. घरात बिबट घुसल्याचे दिसताच शेंडे यांनी आरडाओरड करताच बिबट पळून गेला या घटनेने देवडोंगरीतील नागरिकांमध्ये दहशत पसरली.

Inside the birbat house, there is a sensation in the temple | बिबट घरात घुसल्याने देवडोंगरीत खळबळ

बिबट घरात घुसल्याने देवडोंगरीत खळबळ

Next
ठळक मुद्देवन विभागाने लावले कॅमेरे : बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
वासेरा : ताडोबा बफर झोन क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रातंर्गत वासेरा हद्दीतील देवडोंगरी येथील किशोर शेंडे यांच्या घरात गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बिबट घुसल्याने खळबळ उडाली. दरम्यान, आरडाओरड केल्याने बिबट्याने कुत्राला जखमी करून जंगलात पळ धूम ठोकली. या घटनेनंतर लगेच वन विभागाने देवडोंगरी परिसरात चार कॅमेरे लावले आहे.
वासेरा हद्दीतील वासेरा जायमाळा मार्गालगत देवडोंगरी येथे ४० घरांच्या वस्ती आहे. किशोर शेंडे यांच्या घरी रात्री ११ वाजता बिबट्याने घुसून कुत्राला जखमी केले. घरात बिबट घुसल्याचे दिसताच शेंडे यांनी आरडाओरड करताच बिबट पळून गेला या घटनेने देवडोंगरीतील नागरिकांमध्ये दहशत पसरली. वनविभागाला माहिती दिल्यानंतर क्षेत्र सहाय्यक एस. व्हि. उसेंडी यांनी वनकर्मचारी सोबत घेऊन रात्री उशिरा देवडोंगरीत दाखल झाले. त्यांनी फटाके फोडून बिबट्याला हुसवण्याचा प्रयत्न केला. ताडोबा व्याघ्र संरक्षण दलाला पाचारण केले. वनकर्मचाऱ्यांना तैनात करून परिसरात ४ कॅमेरे लावल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तुपे यांनी यांनी दिली.

Web Title: Inside the birbat house, there is a sensation in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.