पोलीस अधीक्षकांकडून आरोपीची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:34 AM2021-02-17T04:34:48+5:302021-02-17T04:34:48+5:30

घुग्घुस : घुग्घुस येथील शुभम अपहरण व हत्या प्रकरणात आरोपीकडून फेकलेला मोबाइल मिळाला. याप्रकरणाची चौकशी सोमवारी जिल्हा पोलीस ...

Inquiry of the accused by the Superintendent of Police | पोलीस अधीक्षकांकडून आरोपीची चौकशी

पोलीस अधीक्षकांकडून आरोपीची चौकशी

Next

घुग्घुस : घुग्घुस येथील शुभम अपहरण व हत्या प्रकरणात आरोपीकडून फेकलेला मोबाइल मिळाला. याप्रकरणाची चौकशी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात पाच तास स्वत: केली. मात्र अजूनही हत्या का केली, याबाबत कोणत्याही प्रकारचे धागेदोरे गवसले नाही.

बुधवारी आरोपीच्या पोलीस कोठडीचा अंतिम दिवस असल्याने आजही पोलिसांनी कसून चौकशी केली.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आरोपीकडून चौकशी सुरू राहणार आहे. या प्रकरणी शुभमच्या मित्रांना मंगळवारी दुपारी २ वाजता बोलाविले आणि रात्रीपर्यंत बसवून ठेवले होते. त्यामुळे त्यांचीसुद्धा मानसिकता खराब होत आहे. पोलीस आरोपीकडून विचारपूस करीत असली तरी अजूनही घटना कशी व कशासाठी याचा उलगडा झाला नाही.

Web Title: Inquiry of the accused by the Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.