शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन अध्यादेशामुळे शेतकऱ्यांवर अन्याय

By admin | Updated: February 9, 2015 23:11 IST

केंद्र सरकारने तयार केलेला नवीन भूमिअधिग्रहण कायदा शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबिद अली यांनी केली आहे.

कोरपना: केंद्र सरकारने तयार केलेला नवीन भूमिअधिग्रहण कायदा शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबिद अली यांनी केली आहे.या नव्या कायद्यामुळे राष्ट्रीय खाद्य सुरक्षा व उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. केंद्रात २०१४ मध्ये भूसंपादन अधिग्रहण संबंधात काढलेला सुधारित अध्यादेश अन्यायकारक आहे. यूपीए शासन काळात सन २०१३ मध्ये या कायद्यात १३ प्रकारच्या सुधारणा करुन शेतकऱ्यांच्या मुलभूत अधिकारांना बळकट करण्याचे व नवीन उद्योगांना शेतकऱ्यांच्या सहमतीने बंधन घातले होते. परंतु केंद्राने नव्याने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत नव्या कायद्यात उद्योगाला झुकते माप दिले असल्याचा आरोप आहे. इंग्रजांच्या काळातील १९९४ चा भूमिअधिग्रहण कायदा देशात चालविला जात होता. तत्कालिन यूपीए शासनाने त्यामध्ये सुधारणा करुन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी राज्यात आलेल्या कोळसा खाणी, पॉवर प्लॉंट व सिमेंट उद्योगांकडून एकरी आठ ते १५ लाख दर मिळाले. परंतु नवीन धोरणामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होणार आहे. उद्योगाच्या मनमर्जीने जमीन अधिग्रहीत करण्याचा डाव ग्रामीण शेतकऱ्यांसाठी घातक ठरणार आहे. केंद्र शासनाने नव्याने काढलेला जमीन अधिग्रहण धनादेश रद्द करावा, शेतकरी हिताचा अधिग्रहण कायदा कायम ठेवावा, नवीन सुधारित कायद्यात शेतकऱ्यांच्या हिताला महत्व दिले नाही. यामुळे या कायद्यामुळे उपजाऊ जमिनींचे मोठे नुकसान होणार आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली असल्याने अधिग्रहणासाठी घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबीद अली, विनोद जुमळे, अविनाश गौरकार, अशोक तुमराम आदींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)