शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीत सुगंंधित तंबाखूच्या साठ्यावर धाड

By admin | Updated: December 27, 2015 01:20 IST

गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने सूर्यमंदिर वार्ड लुंबिनीनगर येथे सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर धाड टाकली.

आरोपी अटकेत : चार लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त भद्रावती : गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने सूर्यमंदिर वार्ड लुंबिनीनगर येथे सुगंधित तंबाखूच्या साठ्यावर धाड टाकली. यात ३ लाख ९७ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारला दुपारी ३ वाजता करण्यात आली.सूर्यमंदिर वॉर्ड, लुंबिनीनगर येथे आरोपी दीपक डाखराम निखारे (३२) हा स्वत:च्या घरी लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू अवैधरीत्या साठवून त्याची राजरोसपणे विक्री करीत असल्याची गुप्त माहिती चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या पथकाने सापळा रचून दुपारी ३ वाजताच्या सुमारास धाड घातली. धाडीत सुगंधित माजा ५०० ग्रॅम, २०० ग्रॅम, बागबान, बाबा, हिरो, जनम आदी कंपनीचा ३ लाख ९७ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. ही कारवाई पी.आय. कंकाळे यांच्या मार्गदर्शनात उईके, सहायक उपनिरीक्षक दौलत चालखुरे, जाधव, पोलीस हवालदार पद्माकर भोयर, दीपक देशपांडे, संदीप बुरडकर, अमजद खा, गणेश भोयर, चालक ढाकणे या पथकाने केली. (शहर प्रतिनिधी)पोलिसांची भूमिका संशयास्पदया प्रकरणात सापडलेला आरोपी याला यापूर्वी अशाच प्रकरणात भद्रावती पोलिसांनी अटक केली होती. शहरात सुगंधित तंबाखू विकणारे त्याच्यासह अन्य चार व्यापारी आहेत. परंतु त्यांच्यावर अजूनपर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही. पकडण्यात आलेला आरोपी दीपक निखारे याच्या माध्यमातून पोलिसांनी इतर तीन व्यापाऱ्यांशी संगणमत करून महिन्याकाठी ७० हजार रुपयांचा हप्ता बांधल्याची चर्चा खुद्द काही पोलिसात दबक्या आवाजात सुरू आहे. आजची कारवाई चंद्रपूर गुन्हे अन्वेषण शाखेने केल्याने या चर्चेला पुष्टी मिळते.