सावलीत डासांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST2021-02-11T04:29:52+5:302021-02-11T04:29:52+5:30

तलाव आला धोक्यात बल्लारपूर : शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने गावागावात तलाव, बोडी तयार केल्या. मात्र, ...

Infestation of mosquitoes in the shade | सावलीत डासांचा प्रादुर्भाव

सावलीत डासांचा प्रादुर्भाव

तलाव आला धोक्यात

बल्लारपूर : शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी, यासाठी राज्य शासनाने गावागावात तलाव, बोडी तयार केल्या. मात्र, यातील बहुतांश गावांतील तलावात व बोड्यांमध्ये झुडपे वाढल्याने पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात खरीप, तसेच रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन झुडपे तोडावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : येथील बाबूपेठ रेल्वेच्या पुलाचे काम रखडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम त्वरित करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

एटीएमची सुरक्षा रामभरोसे

चंद्रपूर : शहरातील बहुतांश एटीएममध्ये सुरक्षा रक्षक, तसेच सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. बहुतांश ग्राहक बँकेत न जाता एटीएममधून पैसे काढत आहे. एकाच एटीएमवर शेकडो नागरिक पैसे काढतात. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, प्रत्येकाने एका ठिकाणी स्पर्श केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे बंधनकारक आहे. मात्र, चंद्रपूर शहरातील अनेक एटीएम केंद्रामध्ये यापैकी कोणतेही साहित्य उपलब्ध करून देण्यात आले नाही.

Web Title: Infestation of mosquitoes in the shade