शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा तयार करण्यासाठी लगबग वाढली

By admin | Updated: February 15, 2016 01:11 IST

येथील नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तसेच नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली.

विकास कामांचे मोजमाप : नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुढाकारगोंडपिपरी: येथील नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तसेच नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. चालू आर्थिक वर्षात नवनियुक्त युवा पदाधिकाऱ्यांनी धावपळ करीत शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन विकास कामांचे मोजमाप घेणे सुरु केल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र विकासकामांसाठी त्यांची ही धावपळ किती दिवस कायम राहते, यावरही बरेच निर्भर आहे.स्थानिक ग्रामपंचायतीला १७ जून २०१५ रोजी नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाला. तालुकास्तरावरील मोठी ग्रामपंचायत असतानाही शहरातील नागरिकांच्या दैनंनिदन वाढत्या समस्या व मुलभूत गरजा यामुळे शहराला समस्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. याच दरम्यान या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होताच सार्वत्रीक निवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारत गोंडपिपरी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. तत्पूर्वी निवडणूकीदरम्यान राज्याचे अर्थ, वने, नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाला एक हाती सत्ता देण्याचे आवाहन करीत १० कोटींचा विकास निधी देऊ, असे प्रतिपादन केल्याने व आज भाजपाचाच नगराध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान झाल्याने शहरातील नागरिकांना आता विकास निधीतून विकास कामांची अपेक्षा आहे.नगराध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया आटपून एका आठवड्याचा कालावधी लोटला असून नवनिर्वाचीत नगराध्यक्ष संजय झाडे, उपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी सहकारी नगरसेवकांना घेऊन प्रत्येक प्रभागात जाऊन अत्यावश्यक असलेल्या विकासकामांचे मोजमाप घेणे व विकास आराखडा तयार करणे यासाठी धडपड चालविली आहे.आगामी काळात प्राप्त होणाऱ्या विकास निधीतून शहरातील अनेक विकासकामांपैकी रस्ते, नाल्या, बंद गटारे या सर्व मुलभूत गरजांचा विशेष आराखडा तयार केला जात असल्याची माहिती नगरउपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी लोकमतशी बोलताना दिली. तसेच जनतेनी युवकांच्या हाती कारभार सोपविला असून जनतेच्या अपेक्षांचे ओझे हे फारच जड असून याचीच जबाबदारी पार पाडण्याकरिता पदावर विराजमान होताच पहिल्याच आठवड्यात विकास आराखडा तयार करण्याचा मानस नगराध्यक्ष संजय झाडे यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)